एक्स्प्लोर

11th June in History: क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म, सानेगुरुजी यांचं निधन; आज इतिहासात...

11th June in History: सामाजिक आणि दैनंदिन जीवनात 11 जून या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. आजच्या दिवशी क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म झाला होता, सानेगुरुजी यांचे निधन झालं.

11th June in History: जून महिना सुरू झाला आहे. दरम्यान, या महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. आजच्या दिवशी क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म झाला होता, सानेगुरुजी यांचे निधन झालं होतं. चला तर मग जाणून घेऊयात 11 जूनचे इतरही दिनविशेष.

1897: क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म

राम प्रसाद बिस्मिल यांचा जन्म 11 जून 1897 रोजी झाला. बिस्मिल हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते, त्यांनी 1918 च्या मैनपुरी कांडात आणि 1925 च्या काकोरी कांडात भाग घेतला होता. त्यांनी ब्रिटिश साम्राज्यविरोधी विरोधात लढा दिला. त्यांच्या क्रांतिकारी कामामुळे ब्रिटीश सरकारने 19 डिसेंबर 1927 रोजी त्यांना फाशी दिली.

1924 : इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचे निधन 

वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे झाला. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साताऱ्यात वासुदेवशास्त्री तत्कालीन विख्यात संस्कृत पंडित अनंताचार्य गजेंद्रगडकर यांच्या हाताखाली संस्कृत शास्त्र विद्या शिकण्यासाठी राहिले. अनंताचार्य यांच्याकडे वासुदेवशास्त्र्यांनी काव्ये, तर्कसंग्रह व व्याकरण यांचा अभ्यास केला.

1948 : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा जन्म

लालू प्रसाद यादव यांचा जन्म 11 जून 1948 रोजी झाला. ते राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक आहेत. शिवाय, ते बिहार राज्याचे मुख्यमंत्री होते. लालू प्रसाद यादव यांनी वयाच्या 29 व्या वर्षी जनता पक्षाचे उमेदवार म्हणून 1977 मध्ये पाटणा विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.  

1950 :  सानेगुरुजी यांचे निधन 

आज पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांची जयंती आहे. 24 डिसेंबर 1899 रोजी कोकणातील पालगड या गावी जन्मलेले साने गुरुजी हे मानवतावादी समाजसेवक, स्वातंत्र्य सैनिक, मराठी साहित्यिक आणि विचारवंत होते. शेकडो कादंबऱ्या लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद, इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालत होती. 

इतर महत्त्वाच्या घटना:

1665 : मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.

1727 : इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचे निधन

1815 : भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार जुलिया मार्गारेट कॅमेरॉन यांचा जन्म 

1866 : अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना

1894 : टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोडा यांचा जन्म 

1903 : सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांचे निधन 

1903 : सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी ड्रगा माशिन यांचे निधन

1935 : एडविन आर्मस्ट्राँग यांनी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.  
 
1982 : टंबलर चे सहसंस्थापक मार्को आर्मेंट यांचा जन्म 

1983 : भारतीय उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचे निधन. घनश्यामदास बिर्ला हे भारतीय उद्योजक व प्रभावशाली बिर्ला कुटुंबियांपैकी एक होते.
 
1997 : इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन 
 
2000 : कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन

2007 : बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे 130 लोक ठार झाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget