सजंय राऊतांचा वार जिव्हारी, अमोल मिटकरींनी काढली थेट लायकी, म्हणाले, अजितदादांबद्दल बोलणाऱ्याची जीभच हासडली पाहिजे
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी राऊतांवर टीका केली आहे.
Amol Mitkari on Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. अजित पवारांना अर्धे पाकिस्तानी असल्याची टीका राऊतांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता राष्टरवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी राऊंतावर एकेरी शब्दांत टीका केली आहे. संजय राऊंतांचा बापच दाऊद इब्राहिम असल्याने ते असे बोलत असल्याची टीका मिटकरी यांनी केलीय.
अजित पवारांवर बोलायची संजय राऊतांची लायकी आहे का?
अजित पवारांवर असं बोलणाऱ्या संजय राऊतांची जीभ हासडली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया मिटकरींनी दिली आहे. दरम्यान, अजित पवारांवर बोलायची संजय राऊतांची लायकी आहे का? असा सवाल देखील मिटकरींनी संजय राऊतांना केला आहे.
नेमकं काय म्हणाले होतं संजय राऊत?
पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे अनेक लोकांचे प्राण गेले. त्या जखमा अद्याप भरल्या गेलेल्या नसताना पाकिस्तानशी क्रिकेट सामना कशासाठी खेळत आहात? असा सवाल उपस्थित करत शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून आज राज्यभरात आंदोलन केले जात आहे. पाकिस्तान बरोबर होत असलेल्या क्रिकेट सामन्याला शिवसेनेचा विरोध असून ‘माझे कुंकू, माझा देश’ हे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाची माहिती देत असताना शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी सामन्याला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवर जहाल टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार काल केलेल्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचे रक्तवाहत आहे. अजित पवार अर्धे पाकिस्तानी आहेत. जर महाराष्ट्रातील एका मंत्र्यांची ही भाषा असेल तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाची नाही. अजित पवार जे 26 लोक गेले, त्यात तुमच्या घरातलं कोणी असतं तर तुम्ही हे बोलला नसता. तुमचा एखादा ठेकेदार जरी त्यात असता तरी तुम्ही बोलला नसता, असे विधान केले.
काय म्हणाले होते अजित पवार?
खेळाकडे खेळाच्या नजरेतून बघावे की नाही हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. तो संधिधानाने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनं दिला आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काही ना काही भूमिका घेण्याचे विरोधक निमित्त शोधत असतात. फक्त या गोष्टीला भावनिक करुनये असे अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:




















