एक्स्प्लोर
संघाच्या प्रतिनिधी सभादरम्यान अमित शाह दोन दिवस नागपूर मुक्कामी
या बैठकीला भाजपाध्यक्ष अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत.
नागपूर : दर तीन वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक होते. यंदा ही बैठक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात सुरु झाली असून, या बैठकीला भाजपाध्यक्ष अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत.
संघाच्या प्रतिनिधी सभेला संघ परिवारातील सर्व म्हणजेच 36 संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती असते. पण आता 2019 मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर होणारी ही महत्वपूर्ण बैठक आहे.
गेल्या चार वर्षात भाजपनं केलेली कामगिरी यावर या सभेत चर्चा होणार आहे. तसेच संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे या पदासाठी निवडणुकही होईल. मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार भय्याजी जोशींची फेर निवड होऊ शकते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले. त्यामुळे संघाच्या प्रतिनिधी सभेत यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement