एक्स्प्लोर

अमरावतीमध्ये कोरोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला!

अमरावतीमध्ये धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोरोना चाचणीसाठी संशयित तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्यात आला. या प्रकरणी लॅब टेक्निशिअनला अटक करण्यात आली आहे.

अमरावती : कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार अमरावतीमध्ये घडला आहे. बडनेरा पोलिसांनी मंगळवारी (28 जुलै) रात्री कोविड लॅबमध्ये टेक्निशिअन म्हणून काम करणाऱ्या अल्पेश अशोक देशमुख (वय 30 वर्षे) नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कार, अ‍ॅट्रॉसिटी, आयटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित तरुणी अमरावतीमध्ये भावाकडे राहत असून एका मॉलमध्ये नोकरी करते. मॉलमधील कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे 28 जुलै रोजी ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये त्याच्या संपर्कातील 20 जणांचे स्वॅब घेण्यात आले. मात्र स्वॅब घेणाऱ्या अल्पेश देशमुखने तक्रारदार तरुणीला परत बोलावलं आणि "तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली असून युरिनल तपासणी करावी लागेल," असं सांगितले.

ही बाब तरुणीने वरिष्ठ महिला सहकाऱ्याला कळवली. त्या दोघींनी महिला टेक्निशिअन नाही का, अशी विचारणा केली. त्यावर अल्पेश देशमुखने महिला टेक्निशिअन नसल्याचे सांगितले. तसंच तपासणीसाठी तुम्ही एका महिलेला सोबत घेऊ शकता, असंही म्हटलं. त्यानंतर टेक्निशियनने फिर्यादी तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेतले. इतकंच नाहीतर तुमची चाचणी निगेटिव्ह असल्याचंही सांगितलं.

योनीद्वारे घेतलेल्या स्वॅब तपासणीबाबत तरुणीला शंका आली आणि तिने ही बाब भावाला सांगितली. त्याने डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी अशाप्रकारे कोरोनाची चाचणी करत नसल्याचं सांगितलं. यानंतर तरुणीच्या तक्रारीवरुन अल्पेश देशमुख याच्याविरोधात बडनेरा पोलिसांनी विविध कलमांसह गुन्ह्याची नोंद केली.

अशाप्रकारे स्वॅब घेणं हा अत्याचार : जिल्हाधिकारी "कोरोनाच्या चाचणीसाठी अशाप्रकारे स्वॅब घेतला जात नाही. हा अत्याचार आहे. याप्रकरणी लॅब टेक्निशियनविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे," अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

अशा विकृतींना ठेचावं लागेल : यशोमती ठाकूर, महिला बालविकास मंत्री "ही अतिशय धक्कादायक बातमी आहे. ज्याने हा स्वॅब घेतला त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही एक प्रकारची विकृती आहे. अशा विकृतींना ठेचावं लागेल. मुलींना अशावेळी सक्षम करावं लागेल. ती मुलगी बोलली म्हणून हे प्रकरण बाहेर आलं. अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी कडक शिक्षा व्हावी," अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

आरोपीवर कडक कारवाईसाठी प्रयत्न करणार : नवनीत राणा "तो कॉन्ट्रॅक्ट बेसवर हा मुलगा काम करतो. त्या लोकांची मानसिक स्थिती पाहूनच नियुक्ती करावी. ती महिला शिक्षित असल्याने तिने तक्रार केली. त्याला कडक शिक्षा व्हायला पाहिजे. महिला म्हणून आपली जबाबदारी आहे की, आपण अशा गोष्टींची तक्रार केली पाहिजे. मी याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलिसांना बोलणार आहे. आरोपीवर कडक कारवाई व्हावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे," असं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
Uddhav Thackeray: राहुल गांधी पंतप्रधानांच्या घरावर धडकताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, उद्या दिल्लीच्या जंतरमंतरवर जाणार
Uddhav Thackeray: राहुल गांधी पंतप्रधानांच्या घरावर धडकताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, उद्या दिल्लीच्या जंतरमंतरवर जाणार
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
Sharad Pawar : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Embed widget