Akola Vaccination Song : 'सर्वांनी घ्यावं करून, हे कोविड लसीकरण'; अकोला प्रशासनानं तयार केलं लसीकरण गीत
Akola Vaccination Song 'सर्वांनी घ्यावं करून हे कोविड लसीकरण' असे या गीताचे बोल आहेत.
Akola Vaccination Song : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आलेल्या ओमायक्रॉन (Omicron) या व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. याच पार्श्वभूमीवर ज्यांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. आता अकोला (Akola) जिल्हा प्रशासनाने एक गाणं तयार केलंय. 'सर्वांनी घ्यावं करून हे कोविड लसीकरण' असे या गीताचे बोल आहेत.
मुकूंद नितोने यांनी हे गीत लिहिलं असून गिताला संगीतही त्यांनीच आहेय. हे गाणं अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे आणि त्यांच्या पत्नी निता खडसे यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलंये.
अकोला जिल्ह्यात अद्यापही तीन लाख लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाहीये. संभाव्य तिसरी लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाविषयी जनजागृतीसाठी हे गीत तयार करण्यात आलंये. अकोला जिल्हाधिका-यांच्या शासकीय निवासस्थानी हे चित्रीकरण पार पडलंय. काल (गुरूवार) संध्याकाळी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात या गिताचा लोकार्पन सोहळा पार पडलाय. अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसेंचं गायकाचं एक नवं रूप या गिताच्या माध्यमातून पहायला मिळालंय.
राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी राज्यात 79 ओमायक्रॉन रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 876 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 876 रुग्णापैकी 381 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, आज आढळलेल्या ओमायक्रॉनच्या 79 रुग्णापैकी 57 रुग्ण मुंबईतील आहेत. तर ठाणे महानगरपालिकेतील 7, नागपूर सहा, पुणे महानगरपालिका 5, पुणे ग्रामीण 3 आणि पिंपरी चिंचवडमधील एका रुग्णाचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- विठ्ठल मंदिराला पुरातन दगडी फ्लोरिंग; 700 वर्षापूर्वीचे स्वरूप दिलं जाणार!
- इंधन दरवाढविरोधी आंदोलनाचा भडका, कझाकिस्तानमध्ये गृहयुद्धाची स्थिती; रशियन सैन्य दाखल, अमेरिकेचा इशारा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा