एक्स्प्लोर
अकोल्यात उपद्रवी माकडांना तरुणाची अमानुष मारहाण
![अकोल्यात उपद्रवी माकडांना तरुणाची अमानुष मारहाण Akola Monkeys Beaten Up By Youth 2 Dies अकोल्यात उपद्रवी माकडांना तरुणाची अमानुष मारहाण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/28082457/Akola_Monkey_1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अकोला : अकोल्यात उच्छाद मांडणाऱ्या माकडांना एका तरुणाने लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केली आहे. या घटनेत दोन माकडांचा मृत्यू झाला असून, तीन माकडं गंभीर जखमी आहेत.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा गावात शुक्रवारी ही घटना घडली. संतोष खारोडे असं मारहाण करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.
घरावर उच्छाद मांडणाऱ्या माकडांवर संतोषने लोखंडी रॉडने हल्ला केला. यात दोन माकडं दगावली तर 3 जखमी झाली आहेत.. जखमी माकडांवर पशू वैद्यकाकडून उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी आरोपी संतोष खारोडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संतोषच्या या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ 'व्हायरल' झाल्यानंतर त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी प्राणीप्रेमींकडून होत आहे.
![Akola_Monkey_2](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/28082512/Akola_Monkey_2.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
भारत
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)