एक्स्प्लोर
Advertisement
पिचकाऱ्यांनी रंगलेली भिंत स्वतः साफ केली, अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची गांधीगिरी
या 'गांधीगिरी'ने सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकणाऱ्या 'पिचकारीवीरां'च्या मनोवृत्तीच्या कानफटात मारल्या गेली आहे. जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी काल अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली, तेव्हा हा प्रकार घडला.
अकोला : अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या एका 'गांधीगिरी'ची अकोल्यात सध्या चांगलीच चर्चा आहे. या 'गांधीगिरी'ने सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकणाऱ्या 'पिचकारीवीरां'च्या मनोवृत्तीच्या कानफटात मारली गेली आहे.
जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी काल अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयातील भिंती पान, खर्र्ऱ्याच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या दिसल्या. मग, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: बकेट आणि पाणी घेत ती भिंत साफ करायला सुरूवात केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर चांगलंच खजिल व्हायची वेळ आली. या कार्यालयातील अस्वच्छतेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना चांगलंच फैलावर घेतलं.
आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाची झाडाझडती घेतली. अकोला शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांच्या वाईट परिस्थितीमुळे या कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर जनतेचा मोठा रोष आहे.
कामातील बेफिकीरीची स्थिती या कार्यालयाच्या वातावरणातही पहायला मिळाली. दस्तुरखुद्द अकोला जिल्हाधिकाऱ्यांना ही परिस्थिती पाहायला मिळाली आणि स्वच्छतेसाठी ते स्वतःच पुढे सरसावले. पान, तंबाखू, खर्रा खाऊन थुंकल्यामूळे रंगलेल्या भिंती, कार्यालयात झालेले कोळ्यांचे जाळे, धुळीने माखलेल्या फाईल पाहून जिल्हाधिकाऱ्यांचा पारा चढला. जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी थेट बकेट, पाणी आणि कापड मागवत स्वत: पिचकाऱ्यांनी रंगलेली भिंत स्वच्छ करायला सुरूवात केली.
कार्यालयातील भिंत स्वत: जिल्हाधिकारी साफ करत असल्याचे बघताच, कार्यकारी अभियंता कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी तेथे जमले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः भिंत साफ करायला सुरु केल्यानंतर काय करावं ते कर्मचाऱ्यांनाही समजेनासं झालं.
'खजिल' झालेल्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना थांबवलं
कार्यालयातील भिंत जिल्हाधिकारी साफ करत असल्याचं बघताच, तेथे उपस्थित कार्यकारी अभियंता कार्यालयातील एका महिलेने ‘साहेब राहू द्या, आम्ही भिंत साफ करतो’ असे म्हणत भिंत साफ करण्याचे काम थांबवण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली. संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या विनंतीवरून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी भिंत साफ करण्याचं काम थांबविलं.
“कार्यकारी अभियंता साहेब, दोन दिवसांत कार्यालय स्वच्छ करा”
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचं पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. यासंदर्भात जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान यांना कानपिचक्या देत, दोन दिवसात कार्यालयातील साफसफाई करण्याचे निर्देश दिले.
जलसंपदा विभागही 'जाळ्या'त
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लागूनच असलेल्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयालाही भेट देऊन पाहणी केली. त्यामध्ये एका कक्षाच्या प्रवेशद्वारावर असलेले जाळे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी स्वत:च्या हाताने काढून, कार्यालय स्वच्छ ठेवण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या.
संबंधित बातमी :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement