एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

अकोल्यातील रेमडेसिवीरच्या काळाबाजाराचे धागेदोरे जिल्हा रुग्णालयापर्यंत, आतापर्यंत 21 आरोपींना अटक

अकोल्यातील रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणाला आज नवीन वळण लागलं आहे. रेमडेसिवीर काळाबाजाराचे धागेदोरे आता थेट अकोला जिल्हा सर्वोपचार रूग्णालयापर्यंत पोहोचले आहेत. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं आज या प्रकरणी जिल्हा रूग्णालयातील एका नर्ससह वॉर्डबॉयला अटक केली आहे.

अकोला : अकोल्यातील रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणाला आज नवीन वळण लागलं आहे. रेमडेसिवीर काळाबाजाराचे धागेदोरे आता थेट अकोला जिल्हा सर्वोपचार रूग्णालयापर्यंत पोहोचले आहेत. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं आज या प्रकरणी जिल्हा रूग्णालयातील एका नर्ससह वॉर्डबॉयला अटक केली आहे. ऋषिकेश चव्हाण आणि संगीता बडगे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. हे दोघेही जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात कंत्राटी कर्मचारी आहेत. सध्या या दोघांकडून एक रेमडेसिविर इंजेक्शन पोलिसांनी जप्त केलं आहे. या दोघांनी शासकीय रुग्णालयातून आतापर्यंत 1अठराच्या जवळपास रेमडेसिवीरची चोरी करून बाहेर विकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंतच्या पोलीस तपासात अकोल्यात 60 च्या जवळपास रेमडेसिवीरचा काळाबाजार झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या रॅकेटचं जाळं पाहता हा आकडा खुप मोठा असण्याची शक्यता आहे.  जिल्हा रूग्णालयातून आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारे  इंजेक्शन विकली गेलीत?, याचा तपास पोलिस करीत आहेय. या प्रकरणी आधी अटक केलेले सर्व 19 आरोपींमध्ये अकोला शहरातील खाजगी कोविड केअर सेंटर्समधील नर्सिंग स्टाफ आणि मेडीकल स्टोअर्समधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

रूग्णालय प्रशासनाला लागली होती काळाबाजार होत असल्याची कुणकुण :

एकीकडे जिल्ह्यातील खाजगी कोविड केअर सेंटर्स आणि मेडीकल स्टोअर्सवर तुटवड्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळणे दुरापास्त झाले होते. त्याचवेळी मात्र जिल्हा रूग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध होते. याच संधीचा फायदा घेत नर्सिंग स्टाफमधील या दोघांनी हे इंजेक्शन्स बाहेर विकणं सुरू केलं होतं. या दोघांवर रूग्णालय प्रशासनाचा संशय असल्यानं त्यांच्यावर पाळत ठेवली गेल्याचं रूग्णालय प्रशासनानं सांगितलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी रूग्णालयात असे प्रकार होत असल्याची कुणकुण लागल्याचं मान्य केलं आहे. या दोन आरोपींच्या अटकेनंतर जिल्हा रूग्णालयातील आणखी काही आरोपींना पुढच्या काही दिवसांत अटक होण्याची दाट शक्यता आहे. सोबतच यात कुणी उच्चपदस्थ सहभागी आहे का?, याचाही पोलिस तपास करणार आहेत. 

असं हाती लागलं रॅकेट : 

अकोला शहरात गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिवीरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांची रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी मोठी ससेहोलपट आणि संघर्ष सुरू आहे. या इंजेक्शनची मुळ किंमत 1475 इतकी आहे. कंपन्यांनुसार यात थोडा-फार फरक आहे. मात्र, इंजेक्शनच्या तुटवड्याला संधी मानत अनेकांनी याचा काळाबाजार करणं सुरू केलं. त्यामुळे इंजेक्शनची विक्री चढ्या दरात सुरू आहे. त्यातूनच एका रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्या बाजारात किंमत 25 ते 40 हजारांवर गेली आहे. अनेक रूग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी आणि काळ्याबाजाराच्या होत असलेल्या चर्चेतून अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं याप्रकरणी लक्ष घातलं. पोलिसांनी आपले 'पंटर' काळाबाजार होत असलेल्या ठिकाणी पाठवत याची खात्री करून घेतली. अखेर 23 एप्रिलला याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. हे सर्व शहरातील काही मेडिकलमध्ये काम करणारे कर्मचारी होते. या पाच जणांच्या चौकशीतून आणखी काही आरोपी निष्पन्न झालेत. यात एका महिलेचाही समावेश आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणात 21 आरोपी अटकेत आहेत. या प्रकरणात अकोला पोलिसांनी 3 मेला दर्यापूर तालूक्यातील येवदा येथील डॉ. सागर महादेव मेश्राम या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली अहे. त्याचा या काळाबाजारात नेमका काय सहभाग होता?, हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलं नाही. 

रूग्णांसाठी खरेदी केलेली इंजेक्शनही विकलीत :

पोलीस तपासात काही संतापजनक बाबी समोर आल्या आहेत. यातून काळाबाजार करणाऱ्या लोकांचं अतिशय असंवेदनशील रूप समोर आलं आहे. यातील काहींनी चक्क रूग्णांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रयासाने मिळवलेली रेमडेसिवीर इंजेक्शनं संबंधित रूग्णांना दिल्याचे गेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इंजेक्शनची बाटली काढून त्याचा रिकामा डबा रूग्ण आणि नातेवाईकांना दाखवला जात होता. आणि इंजेक्शनची बाटली बाहेर काळ्या बाजारात विकल्या जात होती. या संपूर्ण बाबीत एखाद्या रूग्णाच्या जिवितीचं नुकसान तर झालं नाही ना?, या दिशेनंही पोलीस तपास होणार आहे. 

काळ्या बाजारात इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री : 

या रॅकेटकडून ही इंजेक्शनं अव्वाच्या सव्वा किंमतीत गरजू रूग्णांच्या नातेवाईकांना विकली जात होती. अकोल्यातील काळ्या बाजारात एका रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत २५ ते ४० हजारांच्या दरम्यान असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अटकेत असलेल्या सर्वांची 'आंतरिक साखळी' (इंटर्नल चेन) पोलीस तपासात स्पष्ट होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

या ठिकाणांवरून झाली आरोपींना अटक : 

अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींमध्ये अकोला शहरातील काही खाजगी कोविड केअर सेंटर्समधील नर्सिंग स्टाफ सोबतच काही मेडीकल स्टोअर्सवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.  अकोला शहरातील देशमुख हॉस्पिटल, हॉटेल रिजेन्सी, बिहाडे हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, जय श्रीराम मेडिकल, सार्थक मेडिकल, अकोला मेडिकल, वृद्धी मेडिकल, विश्व माऊली मेडिकल यांचा रेमडीसीवीर इंजेक्शनच्या काळाबाजारात समावेश असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

अकोला रेमडेसिवीर काळाबाजाराचं मोठं केंद्र? : 
या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती पाहता अकोला हे विभागातील रेमडेसिवीरच्या काळाबाजाराचं मोठं केंद्रं तर नाही ना?, असा प्रश्न पडायला लागला आहे. या प्रकरणी अटक झालेले 21 आरोपी, त्यात एका डॉक्टरचा असलेला समावेश ही शक्यता अधिक दृढ करणारा आहे. या प्रकरणात आणखी काही जणांची अटक होऊ शकते. मात्र, या प्रकरणात अकोल्यातील वैद्यकीय क्षेत्रातील काही 'बड्या' माशांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. मात्र, पोलीस तपासात यातील कोणतंच नाव अद्यापही कसं समोर आलं नाही?. यात कोणते 'अर्थ' दडले आहेत?, हे प्रश्नही निर्माण होणारे आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Mahajan On BJP | भाजपने युती धर्म पाळला नाही, मनसेला एकटं पाडलं, प्रकाश महाजनांची टीकाManoj Jarange on Devendra Fadnavis | तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, जरांगेंचा फडणवीसांना इशाराKangana Ranaut On HIndu : देशात अजूनही हिंदू काही ठिकाणी फिरु शकत नाहीRaj Thackeray MNS Symbol :राज ठाकरेंच्या मनसेची मान्यता रद्द होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
Embed widget