एक्स्प्लोर

Akola APMC: अकोला जिल्ह्यातील तीन बाजार समित्यांवर प्रस्थापितांनी सत्ता राखली, वंचित बहुजन आघाडीचा पराभव

Akola APMC Result : अकोला, अकोट आणि बार्शीटाकळीत सत्ता 'जैसे थे' असून वंचितसोबत आघाडी करणाऱ्या आमदार अमोल मिटकरींचा अकोट आणि बार्शीटाकळीत पराभव झाला आहे.  

अकोला : जिल्ह्यातील काल मतदान झालेल्या सातपैकी तीन बाजार समित्यांवर प्रस्थापितांनी आपली सत्ता राखली आहे. राज्यातील सर्वात मोठ्या बाजार समित्यांपैकी एक असलेल्या अकोला बाजार समितीवर महाविकास आघाडीनं निर्भेळ यश मिळवलंय. विशेष म्हणजे भाजप अकोल्यासह जिल्ह्यात महाविकास आघाडीसोबत लढलाय. अकोला बाजार समितीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपप्रणीत सहकार आघाडीनं एकहाती सत्ता आणलीय. सर्वच्या सर्व 18 जागांवर सहकार पॅनलनं एकतर्फी विजय संपादन केलाय. त्यांनी या निवडणुकीत वंचित समर्थित पॅनलचा धुव्वा उडवलाय. अकोला बाजार समितीत सहकार आघाडीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 9 जागा मिळाल्यानं सभापती राष्ट्रवादीचा होणारेय. गेल्या 50 वर्षांपासून अकोला बाजार समितीवर धोत्रे कुटुंबियांची सत्ता आहे. 
 
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :

अकोल्यात राष्ट्रवादी-काँग्रेस-ठाकरे गट आणि भाजप आघाडीचा विजय : 

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील मोठ्या बाजार समित्यांपैकी एक आहे. या बाजार समितीवर स्थापनेपासून पळसोबडे येथील धोत्रे कुटूंबियांची एकछत्री सत्ता आहे. धोत्रे घराण्याने 'सहकार गटा'च्या छत्रछायेखाली सर्व पक्षातल्या लोकांना एकत्र करीत येथे कायम सत्ता राखली आहे. सध्याचे खासदार संजय धोत्रे यांचे वडील दिवंगत माजी आमदार श्यामराव धोत्रे, संजय धोत्रे यांचे चुलतबंधू आणि माजी मंत्री दिवंगत वसंतराव धोत्रे, वसंतराव धोत्रेंचा मुलगा आणि सध्याचे सभापती शिरीष धोत्रे यांच्या नेतृत्वात या बाजार समितीवर सातत्याने या घराण्याची सत्ता राहिली आहे. आज झालेल्या या निवडणुकीतही हीच परंपरा कायम राहिली आहे. अकोला बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपनं एकत्र येत सहकार पॅनलच्या नावाखाली निवडणुक लढवली. या निवडणुकीत या आघाडीनं वंचितच्या नेतृत्वाखालील सेनेच्या एका गटाला सोबत घेत 'शेतकरी शिव पॅनल'च्या नावाखाली निवडणूक लढवली मात्र, यात वंचितच्या पॅनलचा सुफडा साफ करीत काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपनं सर्वच्या सर्व 18 जागा एकहाती जिंकल्यात. 

अकोला बाजार समितीचं सभापतीपद राष्ट्रवादीकडे जाणार! : 

गेल्या 15 वर्षांपासून बाजार समितीचं नेतृत्व करणारे बाजार समितीचे सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते शिरीष धोत्रे यांनी या आघाडीचं नेतृत्व करीत एकहाती विजय मिळविला. या निवडणुकीतही शिरीष धोत्रे तब्बल पाचव्यांदै संचालकपदी विजयी झाले आहेत. आघाडीत सर्वाधिक 9 जागा राष्ट्रवादीने जिंकल्यामूळे बाजार समितीवर राष्ट्रवादीचाच सभापती असेल यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामूळे राष्ट्रवादीचे शिरीष धोत्रे सलग चौथ्यांदा बाजार समितीच्या सभापतीपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. तर उपसभापतीपद भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. 
   
अकोला बाजार समितीतील पक्षीय बलाबल : 

एकूण जागा : 18

  • राष्ट्रवादी : 09
  • भाजप : 05
  • काँग्रेस : 02
  • ठाकरे गट : 02

विजयी उमेदवारांची नावे आणि पक्ष/आघाडी :

    विजयी उमेदवार         पक्ष/आघाडी
1) विकास पागृत           ठाकरे गट
2) दिनकर वाघ              राष्ट्रवादी
3) वैभव माहोरे              भाजप
4) संजय गावंडे              भाजप
5) चंद्रशेखर खेडकर        राष्ट्रवादी
6) राजीव शर्मा                भाजप
7) शिरीष धोत्रे                 राष्ट्रवादी
8) दिनकर नागे                राष्ट्रवादी
9) राजेश बेले                  भाजप
10) भरत काळमेघ             भाजप
11) ज्ञानेश्वर महल्ले             काँग्रेस
12) अभिमन्यू वक्टे             काँग्रेस
13) सचिन वाकोडे              राष्ट्रवादी 
14) रामेश्वर वाघमारे            राष्ट्रवादी
15) शालिनी चतरकर           राष्ट्रवादी
16) माधुरी परनाटे                राष्ट्रवादी
17) मुकेश मुरूमकार            ठाकरे गट
18) हसन चौधरी                  राष्ट्रवादी


अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती :

अकोट बाजार समितीवर काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप आघाडीचा झेंडा : 

अकोट बाजार समितीच्या निवडणुकीत यावेळी प्रचंड चुरस होती. तब्बल चार पॅनल एकमेकांच्या विरोधात येथे उभे ठाकले होते. यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचं सहकार पॅनल, ठाकरे गट-राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचं 'शेतकरी पॅनल', वंचितनं सर्वपक्षीय बंडखोरांना घेत उभं केलेलं पॅनल आणि शेतकरी पॅनलमधून फुटलेलं चौथं बंडखोर पॅनल. मात्र, 'सहकार पॅनल'ने 18 पैकी तब्बल 15 जागा जिंकत एकहाती सत्ता राखली आहे. यासोबतच व्यापारी, अडते आणि हमाल मतदारसंघातून तीन अपक्षांना बाजी मारली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि ठाकरे गटाचे माजी आमदार संजय गावंडेंच्या नेतृत्वाखालील 'शेतकरी पॅनल'सह इतर तीन पॅनलचा पार सुपडासाफ झाला आहे. 

अकोटमध्ये माजी आमदार संजय गावंडेंचा पराभव :

अकोट बाजार समितीत अनेक दिग्गजांना पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. यात ठाकरे गटाचे माजी आमदार संजय गावंडे यांचा सोसायटी मतदारसंघातून सहकार गटाचे गजानन डाफे यांनी पराभव केला. इतर पराभूत दिग्गजांमध्ये माजी सभापती आणि सध्याचे मुख्य प्रशासक गजानन पुंडकर, संचालक राजू मंगळे, विलास साबळे यांचा पराभव झाला. 

नवख्या नेतृत्वाची बाजार समितीत 'एंट्री' : 

या निवडणुकीत नेत्यांच्या घराण्याच्या दुसऱ्या पिढीनं बाजार समितीच्या राजकारणात 'एंट्री' केली आहे. जेष्ठ सहकार नेेेेते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश हिंगणकर यांचा मुलगा धीरज हिंगणकर विजयी झाला आहे. यासोबतच बच्चू कडू यांच्या 'प्रहार'चे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू हे सहकार गटाकडून विजयी झालेत. 

अकोट बाजार समितीतील पक्षीय बलाबल :

  • एकूण जागा : 18 
  • सहकार गट (काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप) : 15
  • अपक्ष : 03

विजयी उमेदवारांची नावं आणि त्यांचा पक्ष/आघाडी

     विजयी उमेदवार        पक्ष/आघाडी
1) शंकरराव लोखंडे         सहकार
2) अविनाश जायले          सहकार
3) रमेश वानखडे              सहकार
4) अंजली सोनोने              सहकार
5) अरूणा अतकड           सहकार
6) कुलदीप वसू                 सहकार
7) गोपाल सपकाळ            सहकार
8) सुनिल गावंडे                 अपक्ष 
9) रितेश अग्रवाल               अपक्ष
10) अजमल खा आसिफ खा  अपक्ष
11) प्रमोद खंडारे                   सहकार
12) श्याम तरोळे                    सहकार
13) गजानन डाफे                  सहकार
14) विजय रहाणे                   सहकार
15) बाबुराव इंगळे                  सहकार
16) धिरज हिंगणकर               सहकार
17) प्रशांत पाचडे                    सहकार
18) अतुल खोटरे                     सहकार


बार्शीटाकळी कृषी उत्पन्न बाजार समिती :

बार्शीटाकळी बाजार समितीवर सहकार गटाने आपली सत्ता अबाधित राखली आहे. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपनं 'सहकार पॅनल'च्या झेंड्याखाली एकत्र निवडणुक लढविली. यात 18 पैकी तब्बल 15 जागा जिंकत सहकार आघाडीनं बार्शीटाकळी बाजार समितीवर आपली सत्ता कायम राखली. तर वंचित आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या आघाडीला फक्त 3 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. वंचितनं मिटकरींसह राष्ट्रवादीचे माजी सभापती विनोद थुटे यांना सोबत घेत निवडणूक लढविली. मात्र, त्यांना दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सहकार गटाचं नेतृत्व भाजप आमदार हरीश पिंपळे आणि काँग्रेसनेते सुनिल धाबेकर यांनी केलं. 
 
बार्शीटाकळी बाजार समितीतील पक्षीय बलाबल : 

  • एकूण जागा : 18
  • सहकार आघाडी ( काँग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गट आणि भाजप)  : 15
  • वंचित-मिटकरी आघाडी : 03

बार्शीटाकळी बाजार समितीतील विजयी उमेदवार आणि त्यांचे पक्ष/आघाडी

     विजयी उमेदवार               पक्ष/आघाडी
1) मंगला गोळे                       सहकार
2) गंगाबाई सोनटक्के              सहकार
3) महादेव काकड                   सहकार
4) अशोक राठोड                    सहकार
5) अशोक कोहर                   वंचित-मिटकरी
6) कल्पना जाधव                  वंचित -मिटकरी
7) गोपाळराव कटाळे              वंचित-मिटकरी
8) शेख अजहर शेख जमीर       सहकार
9) रमेश बेटकर                       सहकार
10) अशोक इंगळे                    सहकार
11) सुरेश शेंडे                          सहकार
12) अनिलकुमार राऊत             सहकार
13) गोवर्धन सोनटक्के              सहकार
14) प्रभाकर खांबलकर              सहकार
15) महादेव साबे                      सहकार
16) रूपराव ठाकरे                   सहकार
17) वैभव केदार                       सहकार
18) सतीश गावंडे                       सहकार

आता बाजार समित्यांचे निकाल लागले आहेत. राजकीय पक्षांनी राजकारण बाजूला ठेवत आता येथून शेतकरी हिताचे कार्यक्रम गतिमान करावेत, हिच माफक अपेक्षा. 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget