Ajit Pawar : मी इथं आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरायची गरज नाही; अजित पवारांकडून मुस्लीम बांधवांना भावनिक साद
वाशीमध्ये राज्यस्तरीय अल्पसंख्याक विश्वास मेळाव्यात अजित पवार यांनी मुस्लीम समाजाला विश्वास देण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला सर्वांना अश्वस्त करतो आपल्या सुरक्षेची जबाबदारी आम्ही करू, असे म्हणाले.
![Ajit Pawar : मी इथं आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरायची गरज नाही; अजित पवारांकडून मुस्लीम बांधवांना भावनिक साद Ajit Pawar to the Muslim community I assure you all that we will take care of your security Ajit Pawar : मी इथं आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरायची गरज नाही; अजित पवारांकडून मुस्लीम बांधवांना भावनिक साद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/18/a5c60ae2539a6e159e525899b82012171708251396496736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
वाशी : आम्ही अनेकांना कॅबिनेटमध्ये आणि पक्षात पदाधिकारी मुस्लिम अल्पसंख्याक बांधवना केलं आहे, आम्ही फक्त बोलत नाही करून दाखवतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मी शब्दाला पक्का आहे, खोटं बोलत नाही, तुम्ही घाबरू नका मी आहे असे सांगत मुस्लीम समुदायाला भावनिक साद घातली. वाशीमध्ये राज्यस्तरीय अल्पसंख्याक विश्वास मेळाव्यात अजित पवार यांनी मुस्लीम समाजाला विश्वास देण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला सर्वांना अश्वस्त करतो आपल्या सुरक्षेची जबाबदारी आम्ही करू, मुस्लिम बंधू महाराजांसोबतही होते असेही त्यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले की, आम्ही करून दाखवतो तसंच बोलतो हेच आमचं असतं. अल्पसंख्याक मुलींना शिकण्यासाठी आम्ही प्राथमिकता देत आहे.वक्फ बोर्डाचे जे प्रश्न आहेत ते ही सोडवू. महामंडळाला आम्ही 500 कोटी दिले आहेत. अनेक ठिकाणी उर्दू घर करणार आहोत. मी आपल्या शब्दाला पक्का आहे, खोटं बोलत नाही.
साताऱ्यात काही दिवसापूर्वी दोन समाजात वाद झाला होता त्यावेळी मी स्वतः गेलो होतो. त्यामुळे तुम्ही घाबरू नका मी आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीत जाण्यासाठी ठरवलं आहे. मात्र, त्या लोकांना वाटतं, स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकात काय होईल. स्थानिक पातळीवरचे निर्णय हे तिकडचे पदाधिकारी घेतील.
मीरारोडला पण काही दिवसापूर्वी वाद झाला. तिथे मी ताबडतोब शिष्टमंडळ पाठवलं आणि तिकडे तणाव होणार नाही याचा सूचना पोलिसांना केल्या, कुठल्याही समाजात तणाव होईल असं आपण करणार नाही, असे त्यांनी सांगितले.
देश पुढे जाण्यासाठी आपण सहकार्य करणार
या कार्यक्रमात बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, आपल्या पक्षाचे भविष्य काय असेल, त्यासाठी आपण एकत्र आलो आहे. आपल्या पिढीचे भविष्य चांगले राहण्यासाठी आपण एकत्र आलो आहेत. देश पुढे जाण्यासाठी आपण सहकार्य करणार आहे. महापुरुषांचा आदर्श पुढे घेऊन आपण पुढे जाणार आहोत. आपण पहिले काँग्रेसमध्ये होतो, त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी स्थापन केली तेव्हा त्यांच्यासोबत गेलो. आता अजित पवार यांच्यासोबत आहे सांगायचं एवढंच की आपल्या परिस्थितीनुसार राहावं लागेल. अजित पवार विकासासाठी महायुतीत गेले आहेत. मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा हजसाठी एकावेळीही तिकीट वाढू दिले नाही. महाराष्ट्रातील भयभीत वातवणार दूर करणार आहोत, तुमच्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही आम्ही तुमच्यासोबत आहोत, असेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)