Ajit Pawar on CM Yogi : अजित पवारांचा सीएम योगी आदित्यनाथ यांना खोचक टोला; शिवरायांवरील दावा खोडून काढला
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवरायांचा संदर्भ समर्थ रामदासांशी जोडल्यानंतर शरद पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा त्यांचा दावा खोडून काढला.
Ajit Pawar on CM Yogi : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवरायांचा संदर्भ समर्थ रामदासांशी जोडल्यानंतर शरद पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा त्यांचा दावा खोडून काढला. राज माता जिजाऊ यांनी शिवाजी महाराज यांनी वाढवलं त्यांच्यावर संस्कार केले. त्यांनीच शिवाजी महाराज यांना घडवण्याचं काम केलं आहे, अशा शब्दात योगी यांनी केलेल्या वक्तव्याचा अजित पवार यांनी समाचार घेतला.
ते म्हणाले की, आज स्वराज्य सप्ताह सुरू झाला आहे. हिंदवी स्वराज्य स्थापना शिवाजी महाराज यांनी केली रयतेच राज्य त्यांनी स्थापन केलं. समाजातील नवीन पिढीला माहिती होण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपला इतिहास त्यांना कळावा हा आमचा हेतू आहे. जागतिक दर्जाचे मँनेजमेंट ग्रूरू म्हणुन राजाचं नाव कायम समोर येतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्व अभ्यास केला, तर लक्षात येत की रयतेचा राजा होते.
अजित पवार यांनी सांगितले की, महाराजांचा जीवनातील कोणताही प्रसंग आपण पाहिला, तर त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय जनतेचं हित लक्षात घेऊन घेतला होता. आपण महाराष्ट्राला महान राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न करूया.
शरद पवारांनी योगींचा दावा खोडून काढला
दरम्यान, योगी आदित्यनाथ हे रविवारी आळंदीत आले असता त्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या मार्गदर्शनामुळे शिवरायांना पुढील कार्य करता आले, असा दावा केला होता. याविषयी शरद पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आमच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामध्ये राजमाता जिजामात यांचे योगदान आहे. जिजाबाईंनीच शिवाजी महाराजांच्या आयुष्याला दिशा दिली, पण जिजाबाईंनी केलेले कर्तृत्त्व बाजुला सारुन त्याचे श्रेय आणखी कोणाला देण्याची भूमिका काही लोक घेत आहेत. पण शिवाजी महाराजांचं स्वत:चं कर्तृत्व, जिजाबाईंचे मार्गदर्शन यामुळे सगळा इतिहास घडला, हे सगळ्या जगाला माहिती आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला होता.
काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ?
महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळतो आहे याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवलं. त्यांनी औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिले. औरंगजेबला असे मारले की आजपर्यंत औरंगजेबला कोणी विचारलं नाही. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथं संतांचं सान्निध्य आहे. याच महाराष्ट्रात येऊन आज सगळ्या संतांचं दर्शन मला घेता येत आहे आणि शिवरायाच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी मला पाहता आल्याचंही योगी आदित्यनाथ म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या