(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar: निर्णय कालच जाहीर होणार होता : अजित पवार
नवीन अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष काम करेल. नवा अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत, असे अजित पवार म्हणाले.
मुंबई: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. त्याचवेळी दुसरीकडे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मात्र वेगळी भूमीका मांडली. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवा अध्यक्ष काम करेल. देशभरात मीटिंग करणं, लोकांना भेटणं सुरू राहिलं. कुणी पण अध्यक्ष झालं प्रांताध्यक्ष झालं तरी शरद पवार यांच्याच मार्गदर्शनाखाली हा पक्ष चालणार आहे. हा निर्णय कालच होणार होता मात्र काल 1 मे असल्यामुळे निर्णय जाहीर केला नाही. आज ना उद्या हा निर्णय होणार होता, असे म्हणत अजित पवारांनी भूमिका मांडली आहे.
अजित पवार म्हणाले , नवीन अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष काम करेल. देशभरात मीटिंग करणं, लोकांना भेटणं सुरू राहिलं. कुणी पण अध्यक्ष झालं प्रदेशाध्यक्ष झालं तरी शरद पवार यांच्या मनाप्रमाणे पक्ष चालणार आहेत. प्रमुखांना एकत्र बसवून निर्णय घेत असतात आणि आज अचनक हा निर्णय घेतला यांची कुणाला माहिती नव्हती. भाकरी फिरवायची म्हणाले मात्र त्यांनी स्वतःपासून फिरवली.
सुप्रिया सुळेंना न बोलण्याचा सल्ला
उद्या नवीन अध्यक्ष झाला तर अडचण काय आहे? शरद पवारांनी हाक दिल्यावर सगळे एकत्र येणार आहेत. खासदारकी आमदारकी बाबत सर्व निर्णय तेच घेतील
हा निर्णय कालच होणार होता, असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना या वेळी झापलं. अजित पवारांनी वेगळी भूमिका मांडली तरी कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा या भूमिकेवर कार्यकर्ते ठाम आहेत. तसेच अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना न बोलण्याचा देखील सल्ला दिला.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले, शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. संघटनेच्याबाबत पुढं काय करायचं याबाबत मी एक समिती करणार असून यात सदस्य निर्णय घेतील. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, दिलिप वळसे पाटील नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रमुख नेत्यांनी निर्णय घ्यावा. मी कुठही असलो तरी सकाळपासून मी संध्याकाळ पर्यंत उपलब्ध राहिलं हे आश्वस्थ करतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या :