एक्स्प्लोर

अजितदादांच्या घातपाताचा मुद्दा मांडताना भाजपचे ट्रोलर्स मला लक्ष्य का करत आहेत? विमानतळ प्राधिकरणाला दिलेली गोपनीय कागदपत्रे, माहिती या ट्रोलर्सना पुरवली जाते; रोहित पवारांचा गंभीर आरोप

रोहित पवार यांनी या ट्रोलर्सचे वर्णन "पैसे घेऊन काम करणारे" आणि "थर्ड क्लास" असे केले. हे ट्रोलर्स विशिष्ट पेजेस चालवतात आणि एका मोठ्या ट्रोलरने पोस्ट टाकली की त्याचे 'बगलबच्चे' ती रिट्वीट करतात.

Ajit Pawar Plane Crash Rohit Pawar on BJP Troller: अजित पवारांच्या अपघाताचा (घातपाताचा) मुद्दा मांडत आहेत, तेव्हा भाजपचे ट्रोलर्स त्यांना लक्ष्य का करत आहेत? अशी विचारणा आमदार रोहित पवार यांनी केली. रोहित पवार यांनी सलग दुसऱ्यांदा व्हिडिओ सादरीकरण अजित पवारांच्या अपघातामध्ये व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. विमानाची नोंदणी सुद्धा बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रोहित पवार यांनी ट्रोल करणारे लोक हे भाजपमधील मोठ्या नेत्यांचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

पैसे घेऊन काम करणारे ट्रोलर्स 

रोहित पवार यांनी या ट्रोलर्सचे वर्णन "पैसे घेऊन काम करणारे" आणि "थर्ड क्लास" असे केले. हे ट्रोलर्स सोशल मीडियावर विशिष्ट पेजेस चालवतात आणि एका मोठ्या ट्रोलरने पोस्ट टाकली की त्याचे 'बगलबच्चे' ती रिट्वीट करतात. त्यांनी समित ठक्कर नावाच्या ट्रोलरचा उल्लेख केला. या व्यक्तीने 28 तारखेच्या घटनेच्या दोन दिवस आधी एक ट्वीट केले होते, ज्यामध्ये येत्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येईल, असे म्हटले होते आणि साडेसात मिनिटांत ते ट्वीट डिलीट केले होते. याबद्दलचे पुरावे त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

गोपनीय माहिती लीक झाल्याचा दावा

त्यांनी गंभीर आरोप केला की, ते आणि त्यांच्यासोबतचे सेलिब्रिटी खेळाडू जेव्हा प्रवास करतात, तेव्हा विमानतळ प्राधिकरणाला (Airport Authority) दिलेली त्यांची गोपनीय कागदपत्रे आणि माहिती या ट्रोलर्सना पुरवली जाते. एअरपोर्ट अथॉरिटीचे लोक ट्रोलरला माझ्याबद्दलची माहिती देण्यासाठी तिथं करतात का? यामागे वेगळी अजून शक्ती आहे का असा सुद्धा प्रश्न इथं निर्माण झाल्याशिवाय राहत नाही, असे रोहित पवार म्हणाले. मला 'वेड लागलंय' असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न हे ट्रोलर्स करत आहेत. त्यांनी या ट्रोलर्सना "चिरकुट" असे संबोधले. "तुमच्याकडे पैसेवाले लोक असतील, पण आमच्याकडे स्वाभिमानी मराठी माणसं आहेत," असे आव्हान दिले.

त्यांनी श्वेता सिंग नावाच्या अधिकाऱ्याचा उल्लेख करत आरोप केला की, ह्या आज त्या डीजीसीएमध्ये बसून त्यांच्या कॉन्टॅक्टचा वापर करून हे फार मोठ्या प्रमाणात तिथे एक रॅकेट चालवतात. आज जो सत्तेत पक्ष आहे मोठा (भाजप), त्याच्या निगडित असणारे हे कुटुंब होतं. भाजप नेत्यांचे VSR कंपनीच्या मालकाशी (रोहित सिंग) संबंध असल्याचा दावा करत ते म्हणतात, रोहित सिंग जो व्हीएसआरचा मालक आहे, त्याच्या लग्नाला दीड-दोन वर्षांपूर्वी तुमचेच जर प्रमुख नेते जात असतील, तर मग आम्ही कशी अपेक्षा करू की तुम्ही पारदर्शी चौकशी कराल? असा सवाल त्यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget