दसरा मेळाव्यादिवशी एकाच वेळी ठाकरे अन् शिंदेंचं भाषण सुरु झालं तर आधी कुणाचं ऐकणार? अजित दादांनी थेट सांगितलं...
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं भाषण एकाच वेळी झालं तर आधी कुणायचं ऐकायचं? यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट उत्तर दिलं आहे.
Dasara Melava: शिंदे आणि ठाकरे गटाच्या (Shinde vs Thackeray) दसरा मेळाव्याची (Dasara Melava Live) सध्या जोरात चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) तर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. एकाच दिवशी हे दोन नेते दसरा मेळाव्यात भाषण करणार आहेत. याची वेळ अद्याप निश्चित झाली नसली तरी दोघांचं भाषण एकाचवेळी सुरु झालं तर नेमकं भाषण ऐकायचं कुणाचं हा सवाल उपस्थित होत आहे. यासंदर्भात राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारणा केली असता त्यांनी थेट उत्तर दिलं आहे.
अजित पवारांनी म्हटलं की, मोठे राजकीय मेळावे घडतात, तेव्हा पोलिस यंत्रणा लागते. आता त्या दोघांमध्ये इर्षा निर्माण झाली आहे. दोघांचं भाषण एकाच वेळी सुरू झालं तर आधी उद्धव ठाकरेंचं बघणार. नंतर एकनाथ शिंदेंचं बघणार असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. शेवटपर्यंत शिवसेनेसोबत ऋणानुबंध जपू, असंही ते म्हणाले.
लोकांना मुस्काटात मारणारी, बंदूक काढणारी लोकं नको
अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले की, अशोक चव्हाण आमच्याकडे आले नव्हते. 2014 ला काय झालं ते बघा. शिळ्या कढीला ऊत येतो. तसं आणू नका. बच्चू कडू यांनी केलेल्या मारहाणीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, मतदारांना चांगली लोक निवडून यावी. लोकांना मुस्काटात मारणारी, बंदूक काढणारी लोकं नको असतात. बच्चू कडूंनी केलेली मारहाण योग्य वाटत नाही, असंही ते म्हणाले.
पालकमंत्री नियुक्त्यांसदर्भात बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना आता पत्र लिहितो. तुमच्याकडून प्रशिक्षण कधी मिळेल. मोफत आहे का काही फी लागणारे आणि ज्ञानात भर पडून घेतो, असा मिश्किल टोला पवारांनी लगावला.
चांदणी चौक पुलासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, तज्ज्ञांनी सांगितलं पूल पाडण्याशिवाय गत्यंतर नाही. पाणी तुंबल्याच्या घटनांवर बोलताना ते म्हणाले की, पुण्यात प्रशासक आहे. मागे पाच वर्षे सरकार कोणाचे होते? असा सवाल त्यांनी केला तसेच पुण्याचा वाढीव पाण्याची गरज आहे. मुळशीच पाणी देण्याची मागणी केली होती, असंही त्यांनी सांगितलं. पोलिस PFI प्रकरणी तपास सुरू आहे असं म्हणतात. पण तपास लवकर संपवावा असंही अजित पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Shinde Group Dasara Melava : "आम्ही विचारांचे वारसदार..." शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं पोस्टर जारी