(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत अपुरी, 25 हजार कोटींची मदत जाहीर करावी : अजित पवार
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना दिलासा म्हणून दहा हजार कोटींची मदतीचे आदेश मुख्यमंत्रींनी दिली आहे. 10 हजार कोटी नव्हे तर किमान 25 हजार कोटींची भरपाई जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांना दिलास देण्यासाठी सरकारकडून 10 कोटींच्या मदतीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. मात्र 10 हजार कोटींची मदत पुरेशी नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत देणार, ही थट्टा लावलीय काय? सरकारला कल्पना नाही, शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं आहे. नुकसानीचा अंदाज घेतला तर कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लागणार आहेत. 10 हजार कोटी कशालाच पुरणार नाही. सरकारची मदत अपुरी आहे. राज्य सरकारने 25 हजार कोटींची मदत जाहीर करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
सरसकट अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपच्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. या संदर्भातलं ट्वीट त्यांनी केलं आहे. पंकजा मुंडेंच्या मागणीवर बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, त्या काळजीवाहू मंत्री आहेत, सूचना काय करत आहेत. कातडी बचाव भूमिका कशी चालेल? असा सवाल अजित पवारांनी विचारला.
सरसकट अतिवृष्टीची नुकसानभरपाई द्यावी. लोकांच्या रांगा आणि अस्वस्थता शांत करण्यासाठी आश्वस्त करणारे शब्द आवश्यक आहेत. अधिकारी आणि बँक यांना कडक सूचना आवश्यक आहेत.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) November 2, 2019
मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाकी होऊन चालणार नाही. सगळ्यांना सोबत घेऊन काम करावं लागेल. 165 जागांचा कौल त्यांना जनतेनं दिला आहे. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन केलं पाहिजे, असंही अजित पवारांनी म्हटलं.