एक्स्प्लोर

झेलम एक्स्प्रेसमधील प्रवाशांची खिडकीतून हात घालून लूट

सिग्नल नसल्यामुळे झेलम एक्स्प्रेस श्रीगोंदा रेल्वे स्थानकात थांबली होती. त्यावेळी तिघा भामट्यांनी खिडकीतून हात घालून लूट केली.

अहमदनगर : अहमदनगरमध्ये झेलम एक्सप्रेसने जाणाऱ्या प्रवाशांना लुटण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.  सोमवारी रात्री आठच्या सुमारास श्रीगोंदा रेल्वे स्थानक परिसरात खिडकीतून आत हात घालून ही लूट करण्यात आली. झेलम एक्स्प्रेस पुण्यावरुन जम्मू तावीला जाते. तिघा लुटारुंनी प्रवाशांचे मोबाईल, घड्याळ आणि सोन्याची चेन लुटली. साधारणपणे एक लाखाचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती आहे. पुणे आणि जळगाव जिल्ह्यातील आरबी दास, राणी खान, बाबू खान आणि वैष्णवी हेगडे या प्रवाशांना लुटण्यात आलं. सिग्नल नसल्यामुळे झेलम एक्स्प्रेस श्रीगोंदा रेल्वे स्थानकात थांबली होती. त्यावेळी तिघा भामट्यांनी खिडकीतून हात घालून लूट केली. या प्रकरणी रात्री दोन वाजता अहमदनगर रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पथक श्रीगोंद्याला रवाना झालं आहे. गेल्या महिन्यातच दरोडेखोरांनी नागपूर-बिलासपूर एक्स्प्रेस लुटली होती. प्रवाशांना धमकावून लाखोंचा ऐवज लुटण्यात आला होता. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. मात्र त्यानंतरही श्रीगोंद्यात वारंवार रेल्वे प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण असून रेल्वेतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Embed widget