एक्स्प्लोर
अहमदनगरमध्ये शिक्षक बँकेच्या सभेतच मास्तरांचा राडा
हुकूमशाही चालणार नाही, गोंधळ सुरुच राहणार असं सांगून विरोधकांनी व्यासपीठाचा ताबा मिळवला. त्यानंतर मास्तरांनी एकमेकांना व्यासपीठावरच धक्काबुक्की केली.
अहमदनगर : अहमदनगरमध्ये प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेतच राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. शिक्षकांनी जोरदार शिवीगाळ करत एकमेकांना धक्काबुक्की केली. सभेतील हाणामारीचा हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांनी घोषणाबाजी करत निषेधाचे फलक फडकावले. यावेळी संचालक मंडळानं सभासदांचा बाप का काढला, त्यांनी अगोदर माफी मागावी तरच सभा सुरु होईल, असं म्हणत जोरदार वादंग सुरु केला.
माफी मागितल्याशिवाय सभा सुरु होऊ न देण्याचं सांगत आधी पाच प्रश्न झाले पाहिजेत, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. हुकूमशाही चालणार नाही, गोंधळ सुरुच राहणार असं सांगून विरोधकांनी व्यासपीठाचा ताबा मिळवला. त्यानंतर मास्तरांनी एकमेकांना व्यासपीठावरच धक्काबुक्की केली.
इतकंच नाही, तर खाली पाडून तुडवलं, एकमेकांवर लोड भिरकावत गोंधळही घातला. मास्तरांना आवरण्यासाठी पोलिसांना व्यासपीठावर बोलवण्यात आलं. तेव्हा पोलिसांनी मास्तरांना ढकलत सभागृहाबाहेर हाकललं.
गोंधळी मास्तरांची गचांडी धरुन पोलिसांनी त्यांना चोप दिला. चार मास्तरांना ताब्यात घेतलं. आहे. पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी व्यासपीठाचा ताबा घेत शिक्षकपदाची लाज राखण्याचं आवाहन केलं.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement