एक्स्प्लोर
नगरमध्ये 15 वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपी फरार
अहमदनगर : लैंगिक अत्याचाराच्या आणखी एका घटनेने अहमदनगर पुन्हा एकदा हादरलं आहे. नांदगाव शिंगवेमध्ये एका 15 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मुख्य आरोपी फरार असून एकाला अटक करण्यात आली आहे.
शनिवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरोपीने घराशेजारीच राहणाऱ्या पीडित तरुणीला भांडी घासण्यासाठी बोलावलं. यावेळी कोणीच नसल्याची संधी साधत आरोपी मल्हारी उमपने साथीदाराच्या मदतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
घाबरलेल्या तरुणीने घरी जाऊन कुटुंबीयांना ही माहिती दिली. त्यानंतर तक्रार करण्यासाठी पीडिता पोलिसात गेली. याची माहिती मिळताच आरोपी पसार झाला, मात्र त्याच्या साथीदाराला अटक करण्यात यश आलं आहे.
नगरच्या कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड
आरोपी मल्हारी हा विवाहित असून शेतमजुरी करत असल्याची माहिती आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.भांबोरा छेडछाड : आरोपींची घरं पेटवली
कोपर्डी बलात्कार : आरोपींच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न
कोपर्डीतील बलात्कार आणि हत्येचं प्रकरण ताजं असतानाच भांबोरीतही काही दिवसांपूर्वी मुलीची छेड काढण्यात आली. यावरुन गावकऱ्यांना आरोपींची घरंही पेटवली होती. या घटना ताज्या असतानाच तिसऱ्या प्रकरणामुळे विविध स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.नगर जिल्ह्यात मुलीचा विनयभंग, आरोपीला बेड्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement