एक्स्प्लोर

Ahmednagar: शेततळ्यात बुडून सख्या बहिण भावाचा मृत्यू, अहमदनगर येथील घटनेने हळहळ 

Ahmednagar News : कपडे धुण्यासाठी शेततळ्यातून पाणी काढण्यास गेलेल्या सख्या बहिण-भावाचा तळ्यात बुडून मृत्यू झाला. अहमदनरमधील संगमनेर येथे ही घटना घडली आहे.

Ahmednagar News Update : शेततळ्यात बुडून सख्या बहिण भावाचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मोधळवाडीच्या घाणेवस्ती येथे घी घटना घडली. जयश्री बबन शिंदे (वय 21 ) आणि आयुष बबन शिंदे (वय 7 ) अशी मृत बहिण भावाची नावे आहेत. शेततळ्यातून पाणी काढताना पाय घसरल्याने आयुष शेततळ्यात पडला. भावाला वाचवण्यासाठी बहिण जयश्रीने शेततळ्यात ऊडी घेतली. परंतु, दुर्देवाने यात दोघांचाही मृत्यू झाला.  

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील पिंपळगाव देपा गावा अंतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे रविवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासोबत राहातात. रविवारी सकाळी मुलगी जयश्री व मुलगा आयुष हे दोघे बहीण भाऊ कपडे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. भाऊ शेततळ्यात पडला त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बहीण जयश्री हिने मागचा पुढचा विचार न करता शेततळ्यात उडी मारली. मात्र, दोघेही खोल असलेल्या शेततळ्यातील पाण्यात बुडाले.

जयश्री आणि आयुष शेततळ्यात बुडाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, त्या अगोदरच दोघांचाही मृत्यू झाला होता. दोघांचेही मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात नेण्यात आले. बहीण भावाच्या दुर्दैवी मृत्यूने पिंपळगाव देपा गावासह पठारभागावर शोककळा पसरली आहे.

जयश्री आणि आयुष या दोन्ही बहीण भावाचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता. त्यामुळे त्यांच्या दृर्दैवी मृत्यूने मोधळवाडी, पिंपळगाव देपा ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली असून अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

महत्वाच्या बातम्या

Dombivli : पाणी टंचाईने घेतला जीव! डोंबिवलीत खदानीत बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू 

BMC : मुंबईकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार, समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
CSK vs LSG IPL 2024: MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
Mukesh Khanna :
"लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतिल तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतील तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Uttam Jankar : माढ्यात भाजपला धक्का; उत्तम जानकर शरद पवारांसोबतTOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 20  April 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 7 AM  :20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Temperature : विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा पारा वाढलेलाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
CSK vs LSG IPL 2024: MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
Mukesh Khanna :
"लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतिल तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतील तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
Horoscope Today 20 April 2024 : आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य
आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य
IPL 2024: रस्सीखेच सुरु झाली...चार संघाचे 8, तर 3 संघाचे 6 गुण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
रस्सीखेच सुरु झाली...चार संघाचे 8, तर 3 संघाचे 6 गुण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
Travel : आता फ्रान्सचा अनुभव मिळेल भारतात! देशातील पहिली 'फ्रेंच कॉलनी!' इथली घरं करतात आकर्षित, एकदा भेट द्या..
Travel : आता फ्रान्सचा अनुभव मिळेल भारतात! देशातील पहिली 'फ्रेंच कॉलनी!' इथली घरं करतात आकर्षित, एकदा भेट द्या..
Embed widget