एक्स्प्लोर

Ahmednagar : दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात दोन महिन्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश 

Ahmednagar News: शिर्डीत एका संशयित दहशतवाद्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शिर्डीची देशभरात चर्चा झाली होती. या घटनेनंतर अहमदनगर प्रशासन सतर्क झालं आहे.

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi News) येथे मागील पंधरा दिवसापूर्वी एका संशयित दहशतवाद्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला पंजाब पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. या घटनेनंतर शिर्डीची देशभरात चर्चा झाली होती. या घटनेनंतर अहमदनगर प्रशासन सतर्क झालं आहे. यामुळंच अहमदनगर जिल्ह्यात रात्र संशयास्पद व्यक्तींच्या तपासासाठी जिल्हा पोलीस दलाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला दहशतवादी कारवायाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. 144 कलम लागू करण्याच्या प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंजूर केला आहे.  
 
आता  या आदेशानुसार जिल्ह्यात घरमालक, लॉजमालक, सायबर कॅफेचालक, मालक, मोबाईल सिमकार्ड विक्रेते, प्रिटिंग प्रेस, ऑफसेट चालक, विस्फोटक गोदाम परवानाधारक, भंगार विक्रेते आणि जूने वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानदारांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. कुणी संशयास्पद किंवा अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास ही माहिती न लपविता तात्काळ पोलीस प्रशासनाला देण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस यंत्रणेसह सर्व यंत्रणानी दक्षता घ्यावी असे आवाहन ही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जारी केलेल्या आदेशातून करण्यात आले आहे. 
 
दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्याबरोबरच सार्वजनिक शांतता अबाधित ठेवणे, दंगलीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार लागू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील घरमालकांनी, घर भाडेकरूंना भाड्याने घर देताना भाडेकरुंबाबतची सर्व सविस्तर माहिती घेवून त्यांचे ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना, शासकीय ओळखपत्र फोटोसह स्थानिक पोलीस स्टेशनला देण्याच्या सूचना देण्यात आल्यात तसेच अहमदनगर पोलीस दलाच्या ahmednagardistpolice.gov.in या वेबसाईटवर सर्व माहिती भरावयास सांगण्यात आले आहे. लॉज मालकांनी आपल्याकडे येणारे सर्व प्रवाशांची माहिती ओळखपत्रासहित  संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर घेऊन त्यांची सविस्तर नोंद आणि सही रजिस्टरला घेऊनच प्रवाशांना लॉज मध्ये प्रवेश द्यावा. तसेच प्रवाश्यांची घेण्यात आलेली सर्व माहिती रेकॉर्ड 2 वर्षांपर्यंत जतन करुन ठेवावे. सायबर कॅफे चालक, मालक यांनी येणारे ग्राहक महिला, पुरुष यांचे ओळखपत्र घेऊन प्रवेश द्यावा. इंटरनेट वापरलेल्या कालावधीची नोंद घ्यावी. एखाद्या संशयीत व्यक्तिस इंटरनेट वापरासाठी देऊ नये. इंटरनेटचा वापर करणारे आक्षेपार्ह वेबसाईटवर सर्च करतात का यावर सायबर चालकांनी लक्ष ठेवावे. तसेच एखादी आक्षेपार्ह वेबसाइट सुद्धा वापरण्यास, आक्षेपार्ह मजकूर टाकण्यास किंवा वेबसाईट वापर करु देऊ नये अशा सूचना देण्यात आल्यात. 
 
मोबाईल सिमकार्ड विक्रेत्यांनी, मोबाईल सिमकार्ड विक्री करतेवेळी सिमकार्ड धारकाचे ओळखपत्र आणि फोटो घेऊन सिमकार्ड घेणारा तोच आहे किंवा कसे याची खात्री करावी तसेच आपले विहित नमुन्यातील रजिस्टरवर त्यांचा फोटो चिकटवून त्यांची इत्यंभूत माहिती नोंदवावी. जेणेकरून सीमकार्डचा दुरुपयोग होणार नाही. यापूर्वी ज्या व्यक्तीचे नावाचे सिमकार्ड आहे त्याच्या संमतीशिवाय इतर अनोळखी व्यक्ती सिमकार्ड वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे प्रकार घडू नये म्हणून वितरकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
 
तर प्रिंटिंगप्रेस, ऑफसेट चालकांनी आपणाकडे धार्मिक मजकूर छापतेवेळी माहिती प्रकाशित करणाऱ्या व्यक्तिचे ओळखपत्र आवश्यक घ्यावे. त्यात काही आक्षेपार्ह मजकूर छापला जाणार नाही याची काळजी घ्यावी. प्रेसमध्ये छापले जाणारे सर्वच निमंत्रणपत्रिका, माहितीपत्रके, बॅनर, भित्तीपत्रके इत्यादी प्रेसचे ठळक नाव छापून मोबाईल नंबर दर्शवावा असं सांगण्यात आलं आहे.
 
विस्फोटक गोदाम परवानाधारक यांनी विस्फोटक , ज्वलनशील साठा ठेवणे, विक्री, खरेदी करणे याठिकाणी नेहमी विस्फोटक वस्तू सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी. देवाण-घेवाण, खरेदी-विक्री करतांना योग्य ते कायदेशीर नियम अटी आणि शर्तीचे पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकलाUddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Dilip Walse Patil: 'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Mike Tyson vs Jake Paul : 27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
×
Embed widget