एक्स्प्लोर

अहमदनगर महापौर निवडणूक : बसपच्या 4 नगरसेवकांचं निलंबन

राष्ट्रवादीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत 18 नगरसेवकांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 18 नगरसेवकांचं निलंबन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला मतदान करणं बसप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना चांगलंच महागात पडणार आहे. बसपच्या चार नगरसेवकांना पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल निलंबित केलं जाणार आहे, तर राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांबाबत उद्या निर्णय घेतला जाणार आहे. बसपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी चौघा नगरसेवकांच्या निलंबनाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच बसपने उमेदवार उभे केले होते, आणि ते निवडूनही आले. मात्र आता झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी पक्षाविरोधात जाऊन भाजपला जाहीर पाठींबा दिला. त्यांच्यासोबतच बसपच्याही चार नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देत भाजपचा महापौर निवडून दिला. बसपने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली असून निवडून आलेल्या चार नगरसेवकांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं साखरे यांनी सांगितलं. या कारवाईबाबत कुठलेही पत्र किंवा नोटीस अद्यापपर्यंत मिळाली नसल्याचं बसपचे गटनेते मुदस्सर शेख यांनी सांगितलं आहे. इतकंच नाही, तर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय सत्तेत राहण्यासाठी स्थानिक पातळीवर घेतला असून निलंबनाची नोटीस मिळाली तर त्याबाबत खुलासा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रवादीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत 18 नगरसेवकांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 18 नगरसेवकांचं निलंबन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अहमदनगरमध्ये सर्वाधिक जागा मिळवूनही शिवसेनेचा गेम कसा झाला? अहमदनगरच्या महापौरपदी भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली, तर उपमहापौरपदी भाजपच्याच मालनताई ढोणे विराजमान झाल्या. वाकळे यांचा 37 विरुद्ध 0 असा विजय झाला. शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला होता. अहमदनगर महानगरपालिका निडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. मात्र मोठा पक्ष असूनही शिवसेना अहमदनगर महापालिकेच्या सत्तेपासून दूर राहिली. पहिल्या क्रमांकाच्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी भाजपने थेट राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. कर्नाटकात जे काँग्रेसने केलं, तेच भाजपने अहमदनगरमध्ये केलं, आकड्यांची जुळवाजुळव इतकी पक्की केली की भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांना 37 मतं मिळाली. भाजपसोबत जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पक्षाने आधीच कारणे दाखवा नोटीस बजावली होती. महापौर-उपमहापौर निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना या पक्षांना पाठिंबा देऊ नये, किंवा त्यांच्या बाजूने मतदान करु नये, असे स्पष्ट आदेश पक्षाच्या वतीने असतानाही भाजपला मतदान करुन पक्षादेश डावलल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Chaudhari: भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Nashik And Raigad Guardian Minister Name: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Embed widget