एक्स्प्लोर
नगरमध्ये भाजपच्या शिवाजीराजे धुमाळ यांना मारहाण

अहमदनगर : अहमदनगरमधील अकोलेचे भाजप नेते शिवाजीराजे धुमाळ यांना मारहाण करण्यात आली आहे. वैद्य नावाच्या व्यक्तीने शिवाजीराजे धुमाळ यांना मारहाण केल्याचं कळतं. एवढचं नाही तर मारहाणीदरम्यान धुमाळ यांच्या गाडीतून 5 लाख रुपये लंपास झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी अकोले पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर शिवाजीराजे धुमाळ समर्थकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. शिवाय मारहाणीच्या निषेधार्थ अकोले बंदचीही हाक दिली आहे. शिवाजीराजे धुमाळ यापूर्वी शिवसेनेत होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी आणि विधानसभा निवडणुकीवेळी भाजपात प्रवेश केला.
Before You Go
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















