एक्स्प्लोर
अहमदनगर मनपा निवडणूक : 400 जणांवर हद्दपारीची कारवाई
जवळपास सर्वच पक्षातील अनेकांची नावं तडीपारीच्या यादीत आहेत.त्यामुळे राहुल द्विवेदी यांच्या कणखर पवित्र्यामुळे संबंधितांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
अहमदनगर : अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तब्बल 400 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी आणि प्रभारी महापालिका आयुक्त राहुल द्विवेदी यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.
निवडणुकीची आचारसंहिता 1 नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेतल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे यादीत जर कोणी निवडणूक लढवणारा उमेदवार असेल तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
जवळपास सर्वच पक्षातील अनेकांची नावं तडीपारीच्या यादीत आहेत. त्यामुळे राहुल द्विवेदी यांच्या कणखर पवित्र्यामुळे संबंधितांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
दरम्यान, अहमदनगर महापालिकेच्या 68 जागांसाठी 9 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 10 डिसेंबरला मतमोजणी होईल.निवडणुकीच्या काळात आचारसंहिता अंमलबजावणीसाठी चार पथके नियुक्त करण्यात आली असून पोलिस अधिकारी, दंडाधिकारी व मनपा अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement