एक्स्प्लोर

Ahmadnagar : शेकडो गरोदर ऊसतोड महिलांच्या हातातही कोयता, सुविधांपासून वंचित! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

Ahmadnagar News in Marathi:  अहमदनगरमध्ये गर्भवती ऊसतोड मजूर, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला विचारला जाब

Ahmadnagar News in Marathi: आपली आणि आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी अगदी गरोदरपणातही ऊसाच्या फडात काम करणाऱ्या महिला मजुरांची दखल थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवण्यात आली आहे. पुढील एका महिन्यात याबाबतचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. ऊसतोड मजुरी करणाऱ्या महिलांपैकी दहा टक्के गर्भवती महिला आहेत, मात्र त्यांना त्यांचे कायदेशीर हक्क आणि सरकारी योजनांतर्गत मिळणाऱ्या लाभांबद्दल माहिती नसल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्याला नोटीस पाठवली आहे.  

पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या गोळ्याला घेऊन उसाच्या फडात राबराब राबायचं. दिवसभर काम करून 200 ते 250 रुपये मिळतात. विशेष म्हणजे अगदी गरोदरपणात किंवा बाळंतपणानंतरही असंच काबाडकष्ट करावं लागतं. यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ना कोणती प्रसूती रजा मिळते, ना बाल संगोपन सुविधा दिली जाते.  सोबतच संबंधित विभागांकडून त्यांना आरोग्यदायी आहार देखील दिला जात नाही.  माध्यमांच्या वृत्ताची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं थेट सरकारला नोटीस पाठवली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात अशा 152 गरोदर ऊसतोड महिला मजूर आहेत. श्रीगोंदा तहसील अंतर्गत येणाऱ्या सात प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत असा गरोदर महिला कामगारांचे सर्व्हेक्षण केलं जातं. त्यानंतर त्यांना त्यांच्या मूलभूत हक्क आणि आरोग्याबाबत जागरूक केलं जातं. त्यासाठी आरोग्य सेविका, आशा गटप्रवर्तक यांची मदत घेतली जाते.

गर्भवती महिलांच्या आरोग्याबाबत जागृती नाही!

श्रीगोंदा तालुक्यात चार साखर कारखाने आहेत. ज्यात देवदैठण येथील साईकृपा फेज वन, हिरडगाव येथील साईकृपा फेज टू, श्रीगोंदा येथील सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना आणि पिंपळगाव पिसा येथील कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.  या चारही साखर कारखान्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील चाळीसगाव, बीड जिल्ह्यातील आष्टी आणि बीड शहरातील ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने येत असतात. यात गरोदर महिलांचेही मोठे प्रमाण असते. मात्र त्यांच्यात आरोग्याबाबत म्हणावी तशी जागृती पाहायला मिळत नाही. प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतर नेमकी काय काळजी घ्यायला हवी यासाठी आरोग्य विभागाकडून त्यांना मार्गदर्शन करण्याचा तोकडा प्रयत्न केला जातो.

गरोदर महिलांना उसाच्या फडात काम करणं रोखण्यासाठी कायदा व्हावा

गरोदरपणातही या महिला ऊसाच्या फडात काम करत असतात, त्यामुळे त्यांच्या बाळाच्याही आरोग्यावर परिणाम होतो. जरी एकीकडे शासनाकडून त्यांच्या आरोग्यासाठी जनजागृती केली जात असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात मात्र आम्हाला कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचं या महिला सांगतात. खरं तर जसं बाल मजुरी रोखण्यासाठी शासनाने कायदे बनवले आहेत, तसंच अशा गरोदर महिलांना उसाच्या फडात काम करणं रोखण्यासाठी कायदा व्हावा. त्यांच्या गरोदरपणात त्यांना शासनाने आर्थिक मदत करावी. म्हणजे त्या पोटाची खळगी भरण्यासाठी जीव धोक्यात घालून उसाच्या फडात काम करणार आणि अशी भावना सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीये. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली, सरकारला नोटीसही पाठवली. मात्र केवळ हे कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष या महिलांसाठी कामं होणं गरजेचं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget