(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar: रोहित पवारांच्या कामात अहिल्याबाईंच्या दृष्टीकोनाचा स्पष्ट विचार दिसतोय- शरद पवार
Sharad Pawar: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
Sharad Pawar: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शरद पवारांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. तसेच राज्याचा विकास करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न गरचेचं आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमात ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेही उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यक्रमात शरद पवार म्हणाले की, "अहिल्यादेवी होळकर यांचं काम हे सर्वसमावेशक होतं. पर्यटनाला प्रोत्साहन देणारं होतं. कितीही संकट आली तरी त्याचा सामना केला पाहिजे आणि राज्यकारभार केला पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. अहिल्यादेवी यांच्याच जयंतीचा कार्यक्रम हा स्त्री वर्गाचा सन्मान करणं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्यांचा अधिकार वाढवण्यासाठी आहे, असं शरद पवार म्हणाले. याशिवाय, त्यांनी कर्जत- जामखेड येथील पाण्याच्या प्रश्नावरही भाष्य केलं. कर्जत- जामखेड महाराष्ट्रातील दुष्काळी भाग आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथील पाण्याचा प्रश्न सुटला नाही. परंतु, एका गोष्टीचा आनंद होत आहे की, तुम्ही रोहित पवारसारख्या तरूण कार्यकर्त्याला संधी दिली. या दोन अडीच वर्षात त्यांनी केलेल्या कामात अहिल्याबाईंच्या दृष्टीकोनाचा स्पष्ट विचार दिसत आहे."
विशेष म्हणजे, आज चौडीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही जयंतीदिनी चौंडीत होणार आहे. याठिकाणी वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर वादाची ठिणगी पडली. अहमदनगरच्या चौंडीत पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यामुळं राडा पाहायला मिळाला. चौंडीत जाण्यापासून पडळकर आणि खोत यांना रोखल्यानं कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरु केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आता गोपीचंद पडळकर यांना चौंडीत जाण्याची परवागनी देण्यात आल्याची माहिती समोर आली.
हे देखील वाचा-
- Nashik Hanuman Birth Place : साधू महंतांच्या मानपमान नाट्यावर पडदा, शास्रार्थ सभेला सुरवात, 'या' धर्मग्रस्थांचा संदर्भ घेणार
- BMC Election 2022: दिग्गजांचे वॉर्ड झाले आरक्षित; यशवंत जाधव, अमेय घोले, महाडेश्वर, अळवणींना शोधावा लागणार दुसरा वॉर्ड
- Raj Thackeray मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल, उद्या शस्त्रक्रिया होणार!