(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : पावसाची दडी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ; सरकारनं लक्ष द्यावं अन्यथा भयंकर संकट : शरद पवार
पिकांना पाण्याची गरज असताना पाऊस पडत नसल्यानं बळीराजा चिंतेत आहे. या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी चिंता व्यक्त केलीय.
Sharad Pawar : सध्या राज्यात पावसानं (Rain) दडी मारली आहे. पाण्याअभावी पिकं माना टाकत आहेत. पिकांना पाण्याची गरज असताना पाऊस पडत नसल्यानं बळीराजा चिंतेत आहे. या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी चिंता व्यक्त केलीय. पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. याकडे सरकारनं तात्काळ लक्ष द्यावं, अन्यथा हे संकट अधिक भयंकर होईल असे शरद पवार म्हणाले. सध्याचे सरकार मात्र, शेतकऱ्यांकडे बघायला तयार नसल्याची टीका शरद पवार यांनी केली. ते सातारा जिल्ह्यातीन माणमध्ये बोलत होते.
15 दिवसात यवतमाळमध्ये 21 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
बीड, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी, तरुण अस्वस्थ आहेत. आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे. त्यांना याची आस्था किती आहे हे सांगता येत नाही, असेही पवार म्हणाले. 15 दिवसात यवतमाळमध्ये 21 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जाला कंटाळून या आत्महत्या केल्या आहेत. हे चिन्ह महाराष्ट्रच्या दृष्टीनं चांगलं नसल्याचे शरद पवार म्हणाले.
शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे हेच माझं धोरण
कधीही कांद्याची एवढी चर्चा झाली नाही तेवढी आता झाली. कांद्याच्या निर्यातीवर सरकारनं मर्यादा आणली आहे. याआधी इतका कर बसवला नाही. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टीका केली. त्यांना मी सांगितले की मी कधी कांद्यावर कर बसवला नसल्याचे शरद पवार म्हणाले. भाजपचे लोक कांद्याच्या माळ घालून आले. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, कांद्याच्या माळ घाला नाहीतर काही करा मी कांद्यावर कर बसवणार नाही असे शरद पवार म्हणाले. शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे हे माझं धोरण असल्याचे शरद पवार म्हणाले.
शेतकऱ्यांचा अहिताची धोरणे आखलेल्या लोकांना आमची साथ नाही. शेतकरी विरोधी धोरणाला लोकांच्या मदतीनं आम्ही त्याला विरोध करु असे शरद पवार म्हणाले. कांदा, ऊस टोमॅटो या मालावर बंधने नको. त्याचा उत्पादन खर्च बघून दर मिळाला पाहिजे. जर दर मिळाला नाहीतर आपण संघर्ष केला पाहिजे असे शरद पवार म्हणाले.
मणिपूर, नागालँडमध्ये संघर्ष, पंतप्रधानांनी तिकडं गेलं पाहिजे
सध्या मणिपूर, नागालँडमध्ये संघर्ष सुरु आहे. स्त्रियांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांची धिंड काढली जाते आणि केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेते. पंतप्रधान मोदींनी तिकडे गेलं पाहिज पण ते तिकडे गेले नाहीत, असे शरद पवार म्हणाले. चीनच्या शेजारील राज्य जपली पाहिजेत असे पवार म्हणाले. देशात वेगळं चित्र निर्माण झालं आहे. त्यासाठी वेगळं काहीतरी केलं पाहिजे. तुमचे दुःख कमी करण्याऐवजी ते वाढेल कसे याकडे सरकारचे लक्ष असल्याचे पवार म्हणाले.
सरकारला धडा शिकवला पाहिजे
पक्ष फोडण्यसाठी केंद्र सरकार काम करत आहे. त्यांच्या विरोधात आता उभे राहिले पाहिजे. त्यांना धडा शिकवला पाहिजे असेही शरद पवार म्हणाले. त्या रस्त्याने आपण जाऊया आणि देशाला दाखवुया की हे लोकांचे राज्य आहे. याचा निर्धार आपण करु. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, असेही शरद पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: