एक्स्प्लोर

Agriculture News : रब्बीची पेरणी करावी कशी? नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकरी संकटात, कर्ज काढण्याची वेळ 

आता रब्बी हंगाम (rabi season) आला आहे. काही ठिकाणी पेरण्या देखील सुरु झाल्या आहेत. मात्र, अद्याप  नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान, पीक विमा मिळाला नाही.

Agriculture News : परतीच्या पावसाचा (Rain) खूप मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. त्यांची हाती आलेली पिकं या पावसामुळं वाया गेली आहेत. खरीप हंगामाची ((Kharif season) पिकं तर वाया गेली आहेत, आता रब्बी हंगाम (rabi season) आला आहे. काही ठिकाणी पेरण्या देखील सुरु झाल्या आहेत. मात्र, अद्याप  नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान, पीक विमा मिळाला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना सावकारी कर्ज काढून रब्बी हंगाम पेरणी करण्याची वेळ आली आहे. 
 
सोयाबीन, उडीद, मूग, कापूस या पिकांचे 100 टक्के नुकसान

नांदेड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 850 मिलिमीटर पावसाची नोंद होते. दरम्यान यावर्षी 1 हजार 350 ते 1 हजार 400 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जो दरवर्षीच्या तुलनेत 400 मिलिमीटरपेक्षा जास्त आहे. सुरुवातीला अवकाळी पावसानंतर अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाच्या जोरदार तडाख्यानं यावर्षी सोयाबीन, उडीद, मूग, कापूस या पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांचा पोळा गोड करु असं आश्वासन देखील दिलं होतं. परंतू पोळा गेला, दसरा गेला आणि आता दिवाळीही गेली, मात्र शेतकऱ्यांच्या तोंडी मदतरुपी सरकारची साखर पडून तोंड काय गोड झालं नाही. पीक विमा मिळाला नाही, अतिवृष्टीची मदत काहीच शेतकऱ्यांना मिळालीय, पण तीही अत्यल्प आहे. दरम्यान रब्बी हंगामाला सुरुवात झाली असताना, रब्बीची पेरणी कशी करावी, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यां पुढे आहे.

दिवाळीच्या तोंडावरही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा,अतिवृष्टीचे अनुदान प्राप्त होवूनही ऐन दिवाळीच्या तोंडावरही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेली पिके पाण्यात गेली आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर पिके पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांच्या दिवाळी निराशेची गेली. खरीप हंगामात काहीच शिल्लक राहिले नसल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावकारी कर्ज काढून रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी पेरणीला सुरूवात केली आहे. दरम्यान आता तरी पिक विमा,अतिवृष्टीचे अनुदान  सरकारने लवकरात लवकर द्यावे यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. 

मराठवाड्यात 12 लाख 49  हजार 731  हेक्टरचे नुकसान 

दरम्यान, मराठवाड्यात परतीच्या पावसानं थैमान घातलं होतं. मोठा फटका येथील शेती पिकांना बसला होता. जून ते ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 12 लाख 49  हजार 731  हेक्टरचे नुकसान झाले होते. यातून सावरत असतानाच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पुन्हा झालेल्या अतिवृष्टीमुळे उरल्यासुरल्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यात मराठवाड्यात 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ज्याचा 28 लाख 76  हजार 816 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तर यासाठी 2479 कोटींची मदत अपेक्षित आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Marathwada: सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मराठवाड्यात 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; मदतीसाठी हवेत 2500 कोटी

महत्त्वाच्या बातम्या

Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
Pune Chakan MIDC: खड्ड्यांमुळे चाकण MIDC चे उद्योजक हैराण, 20 कंपन्या गाशा गुंडाळण्याची तयारीत असतानाच उदय सामंतांकडून हालचालींना वेग, स्वतः चाकणमध्ये जाणार
खड्ड्यांमुळे चाकण MIDCचे उद्योजक हैराण, 20 कंपन्या गाशा गुंडाळण्याची तयारीत असतानाच उदय सामंतांकडून हालचालींना वेग, स्वतः चाकणमध्ये जाणार

व्हिडीओ

Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget