एक्स्प्लोर

Agriculture News : बीड जिल्ह्यात घोणस अळीचं संकट, तीन शेतकरी रुग्णालयात, फवारणी करण्याचं कृषी विभागाचं आवाहन

शेतकऱ्यांसमोर घोणस नावाच्या अळीचं नवं संकट उभं राहिलंय. या घोणस अळीचा (Ghonas worms) परिणाम केवळ पिकावरच नाही तर माणसांवर देखील होताना पाहायला मिळतोय.

Agriculture News : शेतकऱ्यांसमोर सातत्यानं नवनवीन संकट येत आहेत. कधी नैसर्गिक संकट तर कधी सरकारी धोरण हे कायम चालूच आहे. अशातच आता शेतकऱ्यांसमोर घोणस नावाच्या अळीचं नवं संकट उभं राहिलंय. या घोणस अळीचा (Ghonas worms) परिणाम केवळ पिकावरच नाही तर माणसांवर देखील होताना पाहायला मिळतोय. बीड (Beed जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात  हा प्रकार उघडकीस आला आहे. शिराळा गावात ही घोणस अळी चावल्यानं शेतकऱ्यांना रुग्णालयात भर्ती करण्याची वेळ आली आहे. 

शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण 

दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे. या वातावरणातील बदलांचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकांवर होत आहे. पिकांवर विविध प्रकारच्या कीड पडत आहेत. मात्र, घोणस नावाची एक अळी जी गवतावर आणि ऊसावर पाहायला मिळते तिचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. घोणस नावाची विषारी अळी अंगावर पडून तिने चावा घेतल्यानं असह्य वेदना झाल्यानं तीन शेतकऱ्यांना रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली आहे. यामुळं शेतकरी वर्गाच्या मनात धडकी भरली आहे. हा प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यातील शिराळा गावात उघडकीस आला आहे. 

Agriculture News : बीड जिल्ह्यात घोणस अळीचं संकट, तीन शेतकरी रुग्णालयात, फवारणी करण्याचं कृषी विभागाचं आवाहन

घोणस अळीचा जास्त प्रादुर्भाव असेल तर क्लोरोसायफरची फवारणी करा

घोणस नावाची विषारी अळीनं चावा घेतल्यानं तीन शेतकऱ्यांना त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं असल्याची माहिती  तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी दिली आहे. ही अळी म्हणजे कोणत्याही पिकावरील किड नाही तर एक रानटी गवतावरील अळी आहे. जास्त प्रमाणात जर या अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर क्लोरोसायफर (chloro cypher) फवारणं गरजेचं असल्याची माहिती देखील गोरख तरटे यांनी दिली. परंतू जास्त प्रमाणात प्रादुर्भाव नसेल तर काही फवारण्याची गरज नाही. मात्र, शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी म्हणून अळीपासून संरक्षण करण्यासाठी फुल कपडे घालणे गरजेचे आहे. तसेच ही अळी शरीरावर येऊ नये याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन कृषी अधिकारी  गोरख तरटे यांनी केलं आहे. 

बीड जिल्ह्यात आता शेतकऱ्यांपुढं नवीन अस्मानी संकट आलं आहे. या घोणस अळीने चावा घेतल्यास असाह्य वेदना अन उलट्या होत आहेत. दरम्यान, जिथे ही अळी आढळली तिथे जाऊन कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पाहणी करणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. शेतकऱ्यांना देखील काळजी घेण्याचं आवाहन  कृषीमंत्र्यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget