एक्स्प्लोर
Advertisement
... तर राज्यात मध्यावधी निवडणुका?
मुंबई : राज्याच्या राजकारणाची दिशा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निकालावर अवलंबून आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार बहुमताने आलं तर राज्यात शिवसेनेला सरकारमधून बाहेर काढून मध्यावधी निवडणुका घेण्याचं भाजपचं नियोजन असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या दीड तासांच्या बैठकीत हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अजेंड्यावर होता, अशी माहिती 'इकॉनॉमिक टाईम्स'ला भाजपातील एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे.
जिल्हा परिषद, महापालिकांमध्ये ताकद वाढल्याने भाजपची खेळी?
नुकत्याच झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपने चांगलं यश मिळवलं. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्येही भाजपने पराभव केला. त्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभेच्या निकालानंतर भाजप मध्यावधी निवडणुकांवर गांभीर्याने विचार करणार असल्याचंही भाजप नेत्याने 'इकॉनॉमिक टाईम्स'ला सांगितलं.
सत्तेत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून भाजपची होणारी कोंडी पाहता मध्यावधी निवडणुका घेण्याचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
शिवसेनेने पाठिंबा काढल्यास कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन सरकार टिकवून ठेवू शकतो, पण त्याचा सरकारच्या कामकाजावर परिणाम होईल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीचं नियोजन असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ मंत्र्याने 'इकॉनॉमिक टाईम्स'ला दिली.
... तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा पाठिंबा?
राज्यातील एका वरिष्ठ भाजप नेत्यानेही आम्ही मध्यावधी निवडणुकांबाबत विचार करत असल्याचं सांगितलं. शिवेसनेने पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या पाठिंब्याची वाट पाहत बसण्यापेक्षा मध्यावधी निवडणुकांचा पर्याय चांगला आहे, असं राज्यातील भाजप नेत्याने 'इकॉनॉमिक टाईम्स'ला सांगितलं.
राज्यातील सत्तेची ही सर्व गणितं उत्तर प्रदेशातील निकालावर अवलंबून असणार आहेत. तिथे भाजपची कामगिरी असमाधानकारक राहिल्यास शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांचा पाठिंबा घेतला जाऊ शकतो, असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
राजकारण
ठाणे
Advertisement