एक्स्प्लोर

लोकशाहीतील 'फिक्सिंग'चं राजकारण; संभाजी पाटील निलंगेकरांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

धीरज देशमुख यांच्या आमदारकीचा मार्ग सुकर करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसने फिक्सिंग केली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.

लातूर : लातूर ग्रामीणच्या जागेवरून आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. जागा शिवसेनेनं आणि काँग्रेसने फिक्स केली होती, असा गौप्यस्फोट करून संभाजी पाटील निलंगेकर यांनी चर्चेला तोंड फोडले आहे. यावर युतीत हे झालंच कसं? असे मी थेट संभाजी पाटील निलंगेकर यांना विचारणा करणार असल्याचे अमित देशमुख यांनी म्हटलं. निलंगेकर यांना प्रतिआव्हाण करत देशमुखांच्या प्रश्नाला थेटच समोरच उत्तर देऊ म्हणत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी दाखवून दिलं.

धीरज देशमुख यांच्या आमदारकीचा मार्ग सुकर करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसने फिक्सिंग केली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण विधानसभेची भाजपाची जागा ऐनवेळी शिवसेनेला देण्यात आली होती. शिवसेनेनं सचिन देशमुखसारखा कोणालाही माहिती नसलेला अतिशय नवखा उमेदवार दिला. या जागेवर सेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली होती. हे शल्य अनेक भाजपाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आहेच. हीच खंत कोणताही नेता जाहीर बोलून दाखवत नव्हता. मात्र भाजपाचे माजी मंत्री आज आमदार संभाजी पाटील यांनी छेद देत यावर उघड बोलून दाखवले आणि चर्चा सुरू झाली. शिवसेना आणि काँग्रेसने त्यांचा स्वार्थ साध्य करण्यासाठी त्यावेळी फिक्सिंग केली होती असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

संभाजी पाटील निलंगेकरांच्या 'फिक्सिंग'च्या आरोपावर चंद्रकांत पाटलांचं मौन!

याचे पडसाद लातूरच्या राजकारणातच नव्हे तर राज्यातही उमटत आहेत. त्यामागे काही कारणेही आहेत.

1. ऐनवेळी लातूर ग्रामीणची जागा शिवसेनाला कशी देण्यात आली? 2. शिवसेनेच्या स्थानिक पातळीवरून तशी मागणीही झाली नव्हती. मग ऐनवेळी हा बदल का झाला? 3. शिवसेनेचा प्रभाव असलेल्या औसा मतदार संघात दिनकर माने यांचा नैसर्गिक हक्क असताना सेनेने ती दावेदारी सोडत औसा भाजपला का दिला? 4. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना भाजपाचे तिकिट औसातून दिले होते. याचसाठी ही फिक्सिंग सेना-भाजप-देशमुख कुटुंबाने मतदार संघ बदलासाठी अट्टाहास केला का? 5. जिंकण्याची शक्यता असलेली औसासारखी जागा सोडून शक्ती नसलेल्या व ज्या मतदार संघात 'धनुष्यबाण'च माहिती नाही, अशी लातूर ग्रामीणची जागा सेनेने का स्वीकारली? 6. भाजपाच्या देवेंद्र फडणवीस गटाच्या फायद्यासाठी सेनेला लातूर ग्रामीणचा जागा दिली गेली. मात्र सेनेनं तेथे देशमुखांशी फिक्सिंग केली? 7. त्यावेळी भाजपातील गटबाजी उघड झाली. त्यावेळी भाजपचे स्थानिक नेते शांत होते. ते आज का बोलत आहेत? 8. सेनेनं काँग्रेसशी हातमिळवणी करत लातूर ग्रामीणची जागा काँग्रेसला बाय दिली. 9. युती आणि आघाडी धर्म बाजूला सारून वैयक्तिक फायद्याची गणितं कशी जुळवली गेली?

महाराष्ट्रातलं पॉलिटिकल फिक्सिंग! लातूर ग्रामीणच्या आमदारकीवरुन संभाजी पाटील निलंगेकर यांचा गौप्यस्फोट

यावर पालकमंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट करताना सांगितले की, जागेबाबत निर्णय युतीत झाला होता. त्यावेळीची समीकरण आता राहिली नाहीत. मग आता लोकांचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी पाटील निलंगेकर असे आरोप करत आहेत. त्यांनाच मी स्वत: हे विचारणार आहे. कोणत्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्याकडे त्याचा रोख आहे ते त्यांनी सांगावं. यावर संभाजी पाटील निलंगेकर यांनी थेट विचारले तर मी त्यांना थेटच उत्तर देईन असे सांगत निलंगेकरांनी प्रतिआव्हान दिलं आहे.

लातूर ग्रामीणची जागेचे त्यावेळचे प्रबळ दावेदार रमेश कराड यांना साईड कॉर्नर करत जागा सेनेला सोडण्यात आली. त्या निर्णयावर ते प्रचंड नाराज होते. मात्र आजही ते या विषयावर उघड बोलत नाहीत. युतीच्या वरिष्ठ नेतृत्वाला यात काही अडचण वाटली असेल त्यामुळे जाग सेनेला सोडली. निलंगेकर आमचे नेते आहेत. ती घटना त्यांनी जवळून पाहिल्या असतील ते बोलले आहेत. त्यावर मी काय बोलावे? असं म्हणत त्यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांना सूचक पाठींबा दिला आहे.

विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचे स्नेह संपूर्ण राज्याला माहीतच आहे. अमित देशमुख यांच्या लातूर शहर विधानसभा मतदार संघाच्या पहिल्या निवडणुकीत शहरची जागा भाजपाची असताना ती सेनेला सोडण्यात आली होती. त्यावेळी नवीन रचनेत तयार झालेल्या लातूर ग्रामीणची जागा भाजपाच्या वाटयाला आली होती. तिसऱ्याच निवडणुकीत भाजपाने ती जागा सोडत सेनेला दिली. हक्काची आणि विजयाची पूर्ण खात्री असणारी  औसाची जागा सेनेने सोडली. त्यावेळी ही युती आणि आघाडी धर्मापेक्षा मित्रधर्म प्रबळ ठरला होता. तोच पाठ पुढची पिढी गिरवत आहे.

Assembly Elections | लातूर ग्रामीण जागेसाठी विधानसभा निवडणुकीत फिक्सिंग, संभाजी निलंगेकरांचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
Nashik Crime News: 300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा
300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Embed widget