एक्स्प्लोर
अपमानास्पद वागणूक देऊनही पवारांची काँग्रेसलाच साथ : मोदी
शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. परंतु काँग्रेसने त्यांना वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिली आहे. तरीदेखील पवार आज पुन्हा त्याच काँग्रेससोबत गेले, याची मला खंत वाटते. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
बारामती : शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. परंतु काँग्रेसने त्यांना वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिली आहे. तरीदेखील पवार आज पुन्हा त्याच काँग्रेससोबत गेले, याची मला खंत वाटते. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बुधवारी मोदी यांनी बारामतीसह हिंगोली, नंदुरबार, नांदेड, गडचिरोली इथल्या भारतीय जनता पक्षाच्या बुथ कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
मोदी म्हणाले की, काँग्रेसमध्ये असताना शरद पवारांना कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी काँग्रेसने त्यांचा अपमान करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. पण काँग्रेसने त्यांना पक्षामधून बाहेर काढले. तरिही पवार आज पुन्हा त्याच काँग्रेससोबत गेले आहेत, याची खंत वाटते.
दरम्यान काँग्रेस हा केवळ एका कुटुंबाचा पक्ष आहे, असे म्हणत मोदी यांनी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्त झालेल्या प्रियांका गांधी यांचे नाव न घेता टीका केली आहे.
दरम्यान या कार्यक्रमाला दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) आमदार राहुल कुल उपस्थित होते. कुल यांची उपस्थिती सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली. एकिकडे भाजपला बारामतीत राष्ट्रवादीच्या विरोधात तगडा उमेदवार मिळत नाही. त्यातच आता भाजपच्या कार्यक्रमात कुल यांच्या उपस्थितीमुळे त्यांना बारामतीतून लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
लोकसभेच्या उमेदवारीबाबत कुल नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कुल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. परंतु मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेत रासपकडून उमेदवारी मिळवून विजय मिळविला होता.
भारतीय जनता पार्टी कार्यकर्ताओं की पार्टी है, कार्यकर्ताओं द्वारा बनाई गयी पार्टी है और देश के लिए समर्पित पार्टी है।
अगर कोई पार्टी है जो वास्तव में लोकतांत्रिक सिद्धांतों का पालन करती है तो वह भारतीय जनता पार्टी है, लोकतंत्र हमारे संस्कारों में है : पीएम #MeraBoothSabseMazboot pic.twitter.com/4789JpQv3s — BJP (@BJP4India) January 23, 2019
भाजपा वह पार्टी है, जो भारत के लोकतंत्र की सुरक्षा में सबसे आगे रही है।
पश्चिम बंगाल में वहां की सरकार ने लोकतांत्रिक तरीकों से चुनाव नहीं होने दिए। वे तानाशाही के रास्ते पर चलते रहे हैं, लेकिन हम लोकशाही के लिए प्रतिबद्ध हैं : पीएम श्री नरेन्द्र मोदी #MeraBoothSabseMazboot pic.twitter.com/y1DOdyeeRo — BJP (@BJP4India) January 23, 2019
आज देश में नक्सलवाद व माओवाद का खौफ कम हो रहा है। पिछले साढ़े चार वर्षों में माओवादी हिंसा में काफी कमी आयी है। अब माओवाद प्रभावित जिलों की संख्या 126 से घटकर 90 रह गई है। पहले के 36 सबसे ज्यादा माओवाद प्रभावित जिलों की संख्या भी घटकर 30 हो गई है: पीएम मोदी #MeraBoothSabseMazboot pic.twitter.com/FoNPtewW7L
— BJP (@BJP4India) January 23, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement