एक्स्प्लोर

जीएसटी लागू झाल्यानंतरही वीजबिल आणि जमीन व्यवहारांवर दुहेरी कर?

जीएसटी लागू झाल्यानंतरही अनेक अशा सेवा आहेत की ज्याच्यावर दुहेरी कर आकारणी सुरु आहे. जसं की वीज बिल. कांही महत्त्वाच्या सेवा अश्या आहेत ज्यांचं काय करायचं, याचा राज्य सरकारलाही अंदाज नाही.

उस्मानाबाद/नाशिक : वन नेशन वन टॅक्स ही जीएसटीची टॅग लाईन ऐकायला भारी वाटली, तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीत अवघड. जीएसटी लागू झाल्यानंतरही अनेक अशा सेवा आहेत की ज्याच्यावर दुहेरी कर आकारणी सुरु आहे. जसं की वीज बिल. कांही महत्त्वाच्या सेवा अश्या आहेत ज्यांचं काय करायचं, याचा राज्य सरकारलाही अंदाज नाही. त्यामुळे एकीकडे बिल्डर्सला जीएसटीच्या कराखाली आणलं आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारनं मंगळवारीच ग्रामीण आणि शहरी भागासाठीचा मुद्रांक शुल्क एक टक्क्यांनी वाढवलं. या अशा दुहेरी करांमुळे मंत्री सुध्दा गोंधळलेले आहेत. वीजबिल भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांना महावितरणच्या सेवांना जीएसटी लागू झाला आहे की नाही असा प्रश्न पडला आहे. महावितरण मोबाईल कंपन्यांप्रमाणे सेवा पुरवतं. मोबाईल कंपन्यांनी जीएसटी लागू होताच सेवा कर, मूल्यवर्धित कर, स्वच्छ भारत कर वसूल करणं बंद केलं. पण महावितरण स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क, वीज विक्री कर वसूल करतच आहे. यावर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना विचारलं असता त्यांनी महावितरणचे हे दर गेल्यावर्षीच ठरले आहेत. ते एमईआरसी ठरवते. पुढच्या वर्षी आम्ही एमईआरसीकडे जावू. वाढीव कर रद्द करून घेवू असं म्हटलं आहे. उर्जामंत्र्यांचं हे उत्तर म्हणजे ग्राहकांची फसवणूक आहे. गेली 17 वर्ष जीएसटी लागू करण्यावरुन चर्चा सुरु होती. संसदेनं जानेवारीत घटनेत बदल करुन 1 जुलै पासून जीएसटी लागू होणार हे निश्चित केलं. मग ग्राहकांना अतिरिक्त भार लागू नये याची श्रीमान बावनकुळेंनी आधीच काळजी का घेतली नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. दुसरीकडे बांधकाम सुरु असलेल्या सर्व अपार्टमेंट, फ्लॅट विकत घेणाऱ्या ग्राहकांना 12 टक्के जीएसटी आहे. बिल्डर्सना 18 टक्के तर सिमेंटसारख्या वस्तूंवर 28 टक्के. त्यात मंगळवारपासून मुनगंटीवारांनी जमिनीच्या व्यवहारांवर एक टक्का अतिरिक्त स्टँप ड्युटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. वन नेशन वन टॅक्सची घोषणा करताना प्रत्येक वस्तू आणि सेवांवरील इतर अधिभार हटवण्याची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. आता सरकारनं जास्तीचा खिशात घातलेला पैसा परत मिळणार आहे का? हा प्रश्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget