एक्स्प्लोर

'चिखलफेक' आंदोलन कुणाला आवडो न आवडो बाळासाहेबांना नक्कीच आवडलं असतं : नितेश राणे

दरम्यान, नितेश राणेंसह सर्व आरोपींना प्रत्येक रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, बरं आहे की मला दर रविवारी कणकवलीला यायला मिळेल. न्यायालयाने माझा प्रचार सोपा केला आहे.

सिंधुदुर्ग : 'चिखलफेक' आंदोलन कुणाला आवडो न आवडो बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच आवडलं असतं, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. उपअभियंत्याला चिखलाची आंघोळ घालणारे काँग्रेस आमदार नितेश राणे आणि त्यांच्या 18 समर्थकांना जामीन मंजूर करण्यात आला.  जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. हे आंदोलन बाकी कुणाला आवडो न आवडो बाळासाहेब हयात असते तर त्यांना नक्कीच आवडलं असतं. ते म्हटले असते शाब्बास नितेश तू चांगलं काम केलंस, असं म्हणत नितेश यांनी गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. दरम्यान, नितेश राणेंसह सर्व आरोपींना प्रत्येक रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की,  बरं आहे की मला दर रविवारी कणकवलीला यायला मिळेल. न्यायालयाने माझा प्रचार सोपा केला आहे. नितेश राणे म्हणाले की, आम्ही काही गप्प बसणाऱ्यांपैकी नाहीत.  मी जोपर्यंत आमदार आहे, तोपर्यंत  आम्ही लोकांशी बांधील आहोत. लोकांनी यासाठी आम्हाला निवडून दिले आहे. लोकांवर अन्याय होत असताना मी गप्प बसू शकत नाही. उद्यापासून किंबहुना आज या दिवसापासून माझी जबाबदारी सुरू झालेली आहे. कुणीही, कुठेही माझ्या लोकांवर अन्याय करत असेल सर्वात पहिला अन्यायाच्या समोर जाणारा नितेश राणे असेल, असे ते म्हणाले. आम्हाला शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला. आंदोलन केलं ते योग्यच केलं अशी सर्व जुन्या शिवसैनिकांची भावना होती. जे आंदोलन केलं ते लोकांसाठी होतं. आता रस्ता बनवायला सुरुवात केली आहे, यामुळे आम्ही जिंकलो आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आम्हाला जेलमध्ये बसतानाचे फोटो पाहण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी स्वप्न पाहावं.  महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी स्वप्न पाहा. त्यासाठी तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे. 'अपना भी टाईम आयेगा' हे लक्षात ठेवा, असा टोला नितेश यांनी केसरकर यांना उद्देशून लगावला. अधिकाऱ्यावरील चिखलफेकप्रकरणी नितेश राणेंसह 18 समर्थकांचा जामीन मंजूर उपअभियंत्याला चिखलाची आंघोळ घालणारे काँग्रेस आमदार नितेश राणे आणि त्यांच्या 18 समर्थकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सर्व आरोपींना जामीन देण्यात आला आहे. दरम्यान, नितेश राणेंसह सर्व आरोपींना प्रत्येक रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच पुन्हा असा अनुचित प्रकार घडणार नाही आणि पोलिसांना तपासात सहकार्य करु, अशी हमी देखील द्यावी लागणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांकडे बोट दाखवत नितेश राणे आणि कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडेंसह 17 समर्थकांनी अभियंत्याला चिखलाने आंघोळ घातली होती. याप्रकरणी कणकवली न्यायालयाने नितेश राणेंसह 19 जणांची पोलीस कोठडीत रवानगी केली होती. नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी (4 जूलै) मुंबई-गोवा महामार्ग उपअभियंत्यांच्या अंगावर चिखल ओतला होता. त्यानंतर रात्री नितेश आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आले. त्यानंतर त्यांना कणकवली दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget