एक्स्प्लोर

कशेडी घाटात दरड कोसळल्याने 24 तासांनंतर मुंबई गोवा महामार्ग पुर्ववत मात्र दरडीचा धोका कायम!

कशेडी घाटात दरड कोसळल्याने तब्बल 24 तासांनंतर मुंबई गोवा महामार्ग पुर्ववत झाला आहे. मात्र, महामार्ग रुंदीकरणादरम्यान झालेल्या अर्धवट कामामुळे दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे.

रत्नागिरी : तब्बल 24 तासानंतर कशेडी घाटातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुर्ववत सुरू झाला आहे. मात्र, महामार्ग क्रमांक 66 वर अनेक ठिकाणी महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान लगतचे डोंगर भिंतीसारखे उभे कापण्यात आले आहेत. त्यामुळे सुकेळी खिंडीपासून कशेडीघाट, रघुवीर घाट आणि अन्य सर्वत्र पावसाळ्यामध्ये भूस्खलन होऊन दरडी आणि मातीचे ढिगारे महामार्गावर कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाच्या अर्धवट कामाचा फटका सध्या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना बसतोय. काही वर्षे महामार्गावरील रुंदीकरणाचे काम धीम्या गतीने काम सुरू आहे. रुंदीकरणाच्या कामात महामार्गावरील डोंगरकपारीतून अडचणीचा भाग कापण्यात (कट करण्यात) आला. मात्र, त्या भागाला सुरक्षा भिंत बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे डोंगराळ भागातील माती आणि दरड कोसळून महामार्गावर आली. पावसाळ्यात सुकेळी खिंडीपासून कशेडीघाट, रघुवीर घाट आणि अन्य सर्वत्र पावसाळ्यामध्ये भूस्खलन होऊन दरडी आणि मातीचे ढिगारे महामार्गावर कोसळून महामार्ग ठप्प होण्याचे प्रकार घडत असतात.

कशेडी घाटात दरड कोसळल्याने 24 तासांनंतर मुंबई गोवा महामार्ग पुर्ववत मात्र दरडीचा धोका कायम!

गडचिरोलीत आदिवासी बांधव आणि पोलीस सहभागातून किष्टापूरचा शहीद सेतू उभारला

24 तासानंतर कशेडी घाटातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुर्ववत गुरूवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास धामणदेवी गावाच्या हद्दीत सुमारे 75 मीटर्स अंतराच्या रस्त्यावर लगतच्या डोंगरातील लाल मातीची दरड डोंगरावरील झाडांसह कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. रात्रभर दरड हटविण्याचे काम महामार्ग रूंदीकरणाच्या वीर ते कातळीबंगला या कामाची ठेकेदार एलऍण्डटी या कंपनीने तीन जेसीबी प्रोकलेन आणि डंपर्सच्या साह्याने सुरू केले. मात्र, शुक्रवारी सकाळी हे काम सुरू असतानाच पावसाचा जोर वाढून आणखी मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा दरडग्रस्त महामार्गावर पुन्हा कोसळला. परिणामी, दृष्टीपथात आलेले हे दरड हटविण्याचे काम पुन्हा तब्बल 16 तासांसाठी लांबणीवर गेले. घाट बंद पडल्याने महामार्गाच्या दुतर्फा चार ते पाच किलोमीटरच्या उभ्या असलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या. आज पावसाचा जोर ओरसला आणि माती हटविण्याच्या कामाला वेग आला. बरोबर 24 तासानंतर सायंकाळी कशेडी घाटातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुर्ववत सुरू झाला. त्यामुळे घाटात अडकलेल्या प्रवाश्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

Kamathe Ghat | पावसाळ्यात कोकणाच्या सौंदर्याला बहर! कामथे घाटात निसर्गाची मुक्त उधळण

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget