एक्स्प्लोर
तोरणमाळच्या यशवंत तलावात 55-60 किलो वजनी मासा सापडला!
तोरणमाळ हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे.
नंदुरबार : तोरणमाळ येथील यशवंत तलावात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या आदिवासी तरुणांना जवळपास 55 ते 60 किलो वजनाचा मासा सापडला. सिल्व्हर आफ्रिकन जातीचा हा मासा आहे.
तोरणमाळ हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे.
तोरणमाळ येथील यशवंत तलावात बाराही महिने मोठ्या प्रमाणात पाणी असते. या ठिकाणी मासेमारी करुन आदिवासी आपला उदरनिर्वाह करत असतात. नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणांनी मासेमारीसाठी जाळ टाकलं असता, त्यांच्या जाळ्यात हा मासा सापडला.
त्यानंतर हा मासा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यशवंत तलावात पाच वर्षांपूर्वीही असा मोठा मासा सापडल्याचे चर्चेत होते.
तोरणमाळ सातपुड्याच्या दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी मोबाईल नेटवर्क सुद्धा नाही. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी या माशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्यावर ही बाब समोर आली आहे. एवढा मोठा मासा सापडल्यानंतर जिल्ह्यात सोशल मीडियावर एकच चर्चेचा विषय बनला आहे.
पाहा व्हिडीओ -
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement