एक्स्प्लोर
सिंगल पॅरेंट असल्यामुळे मुलाला अॅडमिशन नाकारले, मुख्याध्यापिकेचा व्हिडीओ वायरल
'सिंगल पॅरेंट' असलेल्या मुलांना आमच्या शाळेत अॅडमिशन दिले जात नाही असं सांगून सुजाता यांच्या मुलाला सेंट लाॅरेन्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिकांनी अॅडमिशन नाकारले.

नवी मुंबई : सिंगल पॅरेंट म्हणजे फक्त आई असल्याने मुलाला नवी मुंबईतील एका शाळेनं अॅडमिशन नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. नवी मुंबईतील सेंट लाॅरेंन्स इंग्लिश हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे. सुजाता मोहिते नावाची एक महिला आपल्या मुलाच्या अॅडमिशन करता गेल्या होत्या. सुरुवातीला शाळेनं अॅडमिशन फुल झालं असं सांगितलं. पण, नंतर सुजाता मोहिते यांनी एका व्यक्तीमार्फत आपली ओळख लपवून पुन्हा सेंट लाॅरेंस शाळेत मुलाच्या अॅडमिशन करता प्रयत्न केले असता शाळा अॅडमिशन द्यायला तयार झाली. सुजाता आपल्या मुलाला घेऊन शाळेत गेल्या तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापिकांनी त्यांना पाहून पुन्हा अॅडमिशन देणार नसल्याचे सांगितले. पण सुजाता अॅडमिशन करता अडून बसल्या तेव्हा मात्र त्यांच्या मुलाला का अॅडमिशन दिले जाणार नाही याचे कारण मुख्याध्यापिकांनी सांगितले. ते ऐकून सुजाता यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सुजाता या पतीसोबत राहत नाहीत आणि ज्या मुलांचे पालक एकत्र राहत नाहीत म्हणजे 'सिंगल पॅरेंट' असलेल्या मुलांना आमच्या शाळेत अॅडमिशन दिले जात नाही असं सांगून सुजाता यांच्या मुलाला सेंट लाॅरेन्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिकांनी अॅडमिशन नाकारले. हा सर्व प्रकार सुजाता मोहिते यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यामुळे ही घटना समोर आली. शाळेविरोधात कडक कारवाईची मागणी सुजाता मोहिते यांनी केली असून सिंगल पॅरेंटसाठी सरकारने विशेष लक्ष देण्याची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकाराबाबत सेंट लाॅरेन्सच्या मुख्याद्यापिका आणि मॅनेजमेंटशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही.
आणखी वाचा























