एक्स्प्लोर

जालन्यात अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी आरोपीला 2 वर्षाची सक्तमजुरी

जालना शहरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी आरोपीला 2 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

जालना : शहरातील चंदनजीरा भागात दीड वर्षांपूर्वी एका अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीला एक तरुण सातत्याने छेडायचा, शाळेत येता जाता पाठलाग करायचा या नित्याच्या त्रासाला कंटाळून या मुलीने ही बाब घरच्यांच्या कानावर घातली. मुलीच्या वडिलांनी या छेडछाड करणाऱ्या तरुणाला जाब विचारण्यासाठी समोरासमोर गाठलं. मात्र, सदर तरुणाने उलट मुलीच्या वडिलांना जबर मारहाण केली. या प्रकरणानंतर धास्तावलेल्या मुलीने 14 मार्च 2020 रोजी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या याच कृत्यामुळे मुलीच्या वडिलांनी आरोपी शेख अजहर शेख अब्दुल याच्या विरोधात चंदनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावेळी पोलिसांनी 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी या आरोपी विरोधात चंदनजीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली.

या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकारी पक्षातर्फे 9 साक्षीदार तपासण्यात आले. तसेच आरोपी पक्षाकडून बचावाचे 2 साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी, पीडित मुलगी तिची आई, पंच, साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, पोलीस यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. या घटनेतील युक्तिवाद आणि पुराव्यानंतर काल (शुक्रवारी) जलदगती जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी लैंगिक अपराध संरक्षण अधिनियमानुसार आरोपीला 2 वर्ष सक्तमजुरी तसेच 4 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

या शिक्षेनंतर मुलीच्या आईने  फोनवरून प्रतिक्रिया दिली ज्यात त्यांनी या शिक्षेवर समाधान व्यक्त करत 'अशा प्रकारे आपल्या कुटुंबातील कोणाला त्रास होत असल्यास प्रत्येकाने शेवटपर्यंत लढा देण्याची हिंमत केली पाहिजे. तसेच पुढील अनर्थ टाळण्यासाठी वेळीच तक्रार करण्याची गरज असल्याच बोलून दाखवले. या प्रकरणातील सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील म्हणून अॅडवोकेट वर्षा मुकिम यांनी बाजू मांडली. या निकालानंतर त्यांनीही प्रतिक्रिया दिली. "लहान मुलींच्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. त्या थांबविण्यासाठी समाजामध्ये कायद्याचा धाक असणे खूप महत्त्वाचे आहे." त्यादृष्टीने न्यायालयाने दिलेला हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. दरम्यान शहरात या निकालाची माहिती मिळाल्यावर अनेकांनी मुलीला योग्य न्याय मिळाल्याची भावना प्रगट केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नवा गौप्यस्फोट, पंकजाताईबाबत म्हणाले...Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP MajhaSiddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावेABP Majha Headlines : 04 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
Embed widget