एक्स्प्लोर
सिमेंट मिक्सरचा ब्रेक फेल, रिक्षाला धडकून तिघांचा मृत्यू
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका सिमेंट मिक्सरनं रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात रिक्षाचालक, सिमेंट मिक्सर चालक आणि क्लीनरचा जागीच मृत्यू झाला.
अंबरनाथच्या नवरे नगर परिसरात हा अपघात झाला असून घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. नवरे नगर परिसरातील नवीन बांधकामांना सिमेंट पुरवणाऱ्या मिक्सरची दिवसभर ये-जा सुरु असते. त्यातीलच एक मिक्सर भरधाव वेगानं येत असताना त्याचे ब्रेक फेल झाले आणि त्यानं रिक्षाला जोरदार धडक दिली.
या धडकेत रिक्षाचा चक्काचूर झाला असून रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर प्रवासी जखमी झाले आहेत. रिक्षेच्या धडकेनंतर हा मिक्सर पुढे विजेच्या खांबाला जाऊन धडकला आणि दलदलीत उलटला. त्यातच मिक्सरचा चालक आणि क्लीनरचा मृत्यू झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement