एक्स्प्लोर
कोंढाणेप्रकरणी तिसरी FIR, तटकरे पहिल्यांदाच चौकशीच्या घेऱ्यात
मुंबईः ठाण्यातील कोपरी पोलिस स्टेशनमध्ये कोंढाणे धरणाच्या अनियमिततेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धरणाला परवानगी दिली तेव्हा राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे हे जलसंपदा मंत्री होते. त्यामुळे तटकरेही पहिल्यांदाच एसीबी चौकशीच्या कक्षेत आले आहेत.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांनाही क्लीन चिट दिली नसल्याचं एसबीने स्पष्ट केलं आहे. मात्र सध्या सुनिल तटकरेंची चौकशी होण्याची चिन्हं आहेत. तत्कालीन मंत्री म्हणून या प्रकरणात त्यांची काय भूमिका होती, यासाठी त्यांना एसीबी चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी एसीबीने तिसरी एफआयआर दाखल केली आहे. एसीबीने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तटकरेंसह बांधकाम कंपनीचे निशांत खत्री, डीपी शिर्के यांसह एकूण सहा जणांच्या नावाचा समावेश आहे. चौकशीसाठी एसीबीचं पुढचं पाऊल काय असेल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement