एक्स्प्लोर
Advertisement
गैरहजर कर्मचारी सुनावणीत गप्प, बीडमध्ये बीडीओंनी चक्क 'दगडांनी' सुनावले!
बीडमधील एक गटविकास अधिकारी चांगलेच चर्चेत आले आहेत. गैरहजर कर्मचाऱ्यांना आदेश देवूनही हजर होत नाहीत. कामावर का गेले नाहीत असे विचारणा केले असता बोलतही नाहीत.त्यांना बोलते करण्यासाठी दगड मारण्याशिवाय किंवा माझ्या डोक्यात मारून घेतल्याशिवाय पर्याय माझ्याकडे नाही, असे मत गटविकास अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
बीड : कोरोनाच्या काळातील कामावर गैरहजर राहणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुनावणीमध्ये कर्मचारी काहीच बोलत नाहीत, हे पाहून बीडीओ यांनी चक्क दगड टेबलवर आणून ठेवले आणि आता तुम्हाला दगड धोंड्यांनी समजवावे लागेल का? असे सुनावले. हा प्रकार बीड जिल्ह्यातील धारूर पंचायत समितीमध्ये घडला आहे
कोराणा संकट संकट काळात तालुका आरोग्य विभागामध्ये डाटा एंट्री ऑपरेटरची गरज होती. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांनी गत दोन महिन्यांपूर्वी पंचायत समितीकडे संगणकावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनी चार ग्रामपंचायत डाटा एन्ट्री कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. आण्णासाहेब तिडके, सद्दाम सय्यद, अकबर पठाण यांची आदेशाद्वारे तालुका आरोग्य विभागास नेमणूक केली होती. परंतु सदरचे कर्मचारी हे गत दीड महिन्यापासून कामावर हजर झाले नाहीत.
या कामचुकार कर्मचाऱ्यांची गटविकास अधिकारी यांनी सुनावणी ठेवली होती. सदर तीन कर्मचाऱ्यांना गटविकास अधिकारी यांच्या दालनात बोलावण्यात आले होते. त्याअगोदर गटविकास अधिकारी यांनी कर्मचाऱ्याला दगड आणावयास सांगितले. प्रथम त्यांनी मोठे दगड आणले नंतर लहान दगड आणायला सांगितले. कार्याालया बाहेरून दहा ते बारा दगड आणून टेबलवर ठेवले. दगड जमा केल्यानंतर डाटा एंट्री कर्मचाऱ्यांना सुनावणीस बोलावण्यात आले. सदरील दगड टेबलवर ठेवल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. जे कर्मचारी कामावर जात नाहीत व ऐकत नाहीत अशांना आता दगडाशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी चक्क दालनातच दगड जमा केले होते.
डाटा एंट्री कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात काम करण्यासाठी आदेश देवूनही हजर होत नाहीत. कामावर का गेले नाहीत असे विचारणा केले असता बोलतही नाहीत. त्यांना बोलते करण्यासाठी दगड मारण्याशिवाय किंवा माझ्या डोक्यात मारून घेतल्याशिवाय पर्याय माझ्याकडे नाही, असे मत सोपान अकेले या गटविकास अधिकारी यांनी व्यक्त केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement