एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 जानेवारी 2020 | सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 जानेवारी 2020 | सोमवार
- संवेदनशील मुख्यमंत्री मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाकडे लक्ष देतील, औरंगाबादच्या उपोषणात पंकजा मुंडेंकडून उद्धव ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव, मराठवाड्यात कॅबिनेट बैठक घेण्याचीही मागणीhttps://bit.ly/2U3yN35
- चंद्रपूरमधील दारुबंदीचा पुनर्विचार करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा किंवा आदेश दिला नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची अभय बंग यांना ग्वाही https://bit.ly/37Gxmfb
- घटनाबाह्य काम करणार नाही हे शिवसेनेकडून लिहून घेतलं, काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचा दावा, तर किमान समान कार्यक्रमाव्यतिरिक्त वेगळं असं काही लिहून दिलं नाही, एकनाथ शिंदेंनी दावा फेटाळला https://bit.ly/3aOvuTh
- मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन, तब्येत बरी नसल्याने अवघ्या दहा मिनिटात एनआरसी समर्थनासाठीची मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक आटोपली https://bit.ly/317yl5D
- एकदा चक्र फिरलं की सगळं बिघडतं, भाजप सत्तेवर येणार म्हणून निवडणुकीच्या आधी जे भाजपच्या वाटेवर गेले त्या सगळ्यांची वाट लागली, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचं वक्तव्य https://bit.ly/38KoEfE
- दिल्लीच्या शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईतल्या नागपाड्यात सीएएविरोधात आंदोलन, जोपर्यंत कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच राहणार, आंदोलक महिला आपल्या भूमिकेवर ठाम https://bit.ly/2RS28uF
- काँग्रेसचं अध्यक्षपद राहुल गांधींकडे पुन्हा जाण्याची शक्यता, तर काँग्रेस उत्तर प्रदेशात प्रियंका गांधींना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उतरवेल, सूत्रांनी माहिती https://bit.ly/2RsMfvQ
- एअर इंडियाचा 100 टक्के समभाग विकण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, गुंतवणुकीसाठी निविदा मागविल्या, तर हा प्रस्ताव देशविरोधी असून या विरोधात कोर्टात जाणार, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांची ट्विटरवर माहिती https://bit.ly/3aLLOEn
- पाच वर्षीय हर्षिती भोईरचा अनोखा विक्रम, प्रजासत्ताक दिनी सह्याद्रीच्या कुशीतील पाच किल्ल्यांवर तिरंगा फडकवला, सर्वात कमी वयातील गिर्यारोहक म्हणून वर्ल्ड बुक, आशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार https://bit.ly/2sWVtXA
- सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट आणि त्याच्या 13 वर्षीय मुलीचा अपघाती मृत्यू, निधनामुळे जगभरातून शोक व्यक्त https://bit.ly/2uE9KJu
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement