एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 23/09/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 23/09/2018
- मुंबईसह राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष , मुंबईतील प्रसिद्ध गणपतीही मार्गस्थ, ‘लालबागचा राजा’, ‘मुंबईचा राजा’सह अनेक गणपतीवर श्रॉफ बिल्डिंगजवळ पुष्पवृष्टी, थायलंडमध्ये प्रतिष्ठापना झालेल्या बाप्पाचं जुहू चौपाटीवर विसर्जन https://goo.gl/sMijJP
- पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचं विसर्जन, अलका चौकात मानाच्या गणपतींवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, महापौर मुक्ता टिळकांचं कातकरी महिलांसोबत नृत्य https://goo.gl/QMRQ9H
- नाशिकसह कोकणात बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप, डीजेबंदीमुळे पुण्यात सव्वाशे मंडळांचा विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार, चंद्रपुरात डीजेचे चार बॉक्स लावण्यास परवानगी https://goo.gl/jKU7KY
- मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं वर्षा बंगल्यावर कृत्रिम हौदात विसर्जन, मिरवणुकांमध्ये डीजे, डॉल्बीपेक्षा पारंपरिक वाद्य वापरण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आवाहन https://goo.gl/MDb4uK
- कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांच्या बॉडीगार्ड्सची दादागिरी, गणेश विसर्जन मिरवणुकीत कोल्हापूरच्या महापौर शोभा बोंद्रे यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप https://goo.gl/Dj6uuE
- बुलडाण्यात मेहकर-जालना रस्त्यावर बोलेरो पिकअपला भीषण अपघात, बँड पथकातील पाच जणांचा मृत्यू, आठ जखमी https://goo.gl/Ebrj4m
- जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'चा शुभारंभ, रांचीतून पंतप्रधानांकडून योजनेचं लोकार्पण, देशातील दहा कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना फायदा https://goo.gl/rvMWHk
- आंध्र प्रदेशात टीडीपीच्या आजी-माजी दोन आमदारांची माओवाद्यांकडून हत्या, जखमी पीएचाही मृत्यू, हत्येचं कारण अस्पष्ट https://goo.gl/x34aHJ
- गोल्डन ग्लोब रेसदरम्यान खोल समुद्रात बोटीचा चेंदामेंदा, नौदल अधिकारी अभिलाष टॉमींची मृत्यूशी झुंज, जगभरातील यंत्रणांकडून बचावकार्याला वेग, भारतीय युद्धनौकाही रवाना https://goo.gl/JTkUJf
- आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय https://goo.gl/tAEKDj
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
ठाणे
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
Advertisement




















