एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09/06/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09/06/2018*
- राज्यातील अनेक भागात मान्सून सक्रिय, मुंबईतही मुसळधार पावसाची हजेरी https://goo.gl/VW15e6
- मुसळधार पावसाने पुन्हा एकदा मुंबईची तुंबई, हिंदमाता, किंग्ज सर्कल भागातील रस्ते पाण्याखाली, लोकल वाहतुकीवरही परिणाम https://goo.gl/VW15e6
- मुंबईत माटुंग्यानंतर हिंदमाताजवळही मॅनहोल उघडं, 'झाकणचोरीं'समोर मुंबई महापालिका हतबल https://goo.gl/hsVwof ठाण्यात टँकरला धडकून 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू https://goo.gl/VHhLsG
- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर दुसऱ्या दिवशीही तोडगा नाहीच, महामंडळ व्यवस्थापकांची कर्मचारी संघटनांसोबतची बैठक फिस्कटली https://goo.gl/ipLGnb
- संपकाळात डबल ड्युटी करुन घरी परतताना हिंगोलीत एसटी चालकाचा मृत्यू, कामाच्या तणावामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप https://goo.gl/MwivF4
- महाराष्ट्रात महाआघाडी करण्यासाठी काँग्रेसचं पहिलं पाऊल, कर्नाटक आणि पालघर निवडणुकीनंतर राज्यातील विरोधी पक्षांना भाजपविरोधात एकत्र आणण्याचा प्रयत्न https://goo.gl/DrHNoQ
- कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे भाजपच्या तिकिटावर विधानसभा लढण्याचे संकेत, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार काम करणार असल्याचंही स्पष्टीकरण http://abpmajha.abplive.in/
- नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देऊ, धमक्यांना घाबरणार नाही, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी ठणकावलं https://goo.gl/fcbMyr
- मुंबईतील फोर्ट परिसरातील कोठारी मॅन्शन इमारतीला लागलेली भीषण आग आटोक्यात, आगीनंतर इमारतीचा अर्धा भाग कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही https://goo.gl/BCdBhe
- मुंबईत मरिन ड्राईव्हवर रस्त्याच्या मधोमध खुल्लम खुल्ला प्यार, प्रेमी युगुलाचा व्हिडीओ व्हायरल, महिलेची सुधारगृहात रवानगी https://goo.gl/v2bypA
- अहमदनगरच्या उपमहापौरपदाचा राजीनामा दिलाच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमचा दावा https://goo.gl/ecWgcx
- राहुल फटांगडे हत्या प्रकरणातील चौघा आरोपींची माहिती देणाऱ्यांना मराठा युवा क्रांतीकडून 50 हजारांचं इनाम जाहीर, मुंबईत ठिकठिकाणी होर्डिंग्स https://goo.gl/g1T51z
- 15 दिवसांपासून वीज नसल्याने पालघरमधील शेतकरी हैराण, महावितरणने ट्रान्सफर्मर काढून नेल्याने पाण्याअभावी पिकं कोमेजली, शेतकरी हवालदिल https://goo.gl/YJFX4d
- नाशिक जिल्ह्यातील म्हसरुळमधील गोळीबारात जखमी नितीन परदेशीचा उपचारादरम्यान मृत्यू, 6 जूनला रात्री नितीनवर अज्ञातांचा गोळीबार, आरोपींचा शोध घेण्यात पोलीस अपयशी http://abpmajha.abplive.in/
- अहमदनगरच्या सीना नदीपात्रात निजामकालीन अवशेष आढळले, सापडलेले अवशेष पाण्याच्या हौदाचे असल्याचा पुरातत्व तज्ज्ञांचा अंदाज https://goo.gl/hLEVXa
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement