एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/12/2017
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/12/2017
- गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान संपन्न, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 60.16 टक्के मतदान, पंतप्रधान मोदींसह राहुल गांधीचीही प्रतिष्ठा पणाला https://goo.gl/eKrPD8
- नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याची माहिती, मुख्यमंत्र्यांसह इतर नेते सुखरुप https://goo.gl/zFBJCj
- उद्धव ठाकरेंनी तोंड बंद न ठेवल्यास मातोश्रीवरील गुपितं बाहेर काढू, सांगलीत नारायण राणेंचा इशारा, लवकरच मंत्रीपद मिळण्याचाही दावा https://goo.gl/wHC2E9
- मोदी सरकारच्या जाहिरातबाजीवर 3 वर्षात तब्बल 3 हजार 755 कोटी रुपये खर्च, माहिती अधिकारातून खर्चाचा तपशील उघड, मन की बातच्या जाहिरातीवर साडेआठ कोटी https://goo.gl/sp9tdg
- कोपर्डीच्या निकालानंतर गेले 10 दिवस शालेय वाहतुकीसाठी सुरु केलेली श्रीगोंदा ते कोपर्डी बससेवा बंद, माझाच्या वृत्तानंतर बससेवा पुन्हा सुरु करण्याचं अधिकाऱ्यांचं आश्वासन https://goo.gl/YN18zG
- बीड जिल्ह्यातील परळीत वैद्यनाथ साखर कारखान्यात ऊसाच्या रसाची टाकी फुटून तीन कामगारांचा मृत्यू, 8 कामगार गंभीर जखमी https://goo.gl/6AUcTa
- वाशिममधील ज्ञानेश्वर मिसाळ या शेतकऱ्याची आत्महत्या सावकारी तगाद्यातून, मुलाची तक्रार, सरपंचासह तिघांविरोधात गुन्हा दाखल https://goo.gl/JYXq2x
- मुंबईजवळील टिटवाळ्यात इंजिनीअर तरुणाची आत्महत्या, पोलिसांच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप https://goo.gl/KSmcG8
- पुण्यात जुगार खेळताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताब्यात, तर क्लब चालक माजी नगरसेवक अविनाश जाधव यांच्यासह 41 जणांवरही गुन्हा दाखल http://abpmajha.abplive.in/
- अभ्यासासाठी ओरडल्याने दिल्लीत आई आणि बहिणीची हत्या, 15 वर्षीय मुलगा अटकेत, बॅट आणि पिझ्झा कटरने हत्या केल्याची मुलाची कबुली https://goo.gl/gaHkKW
- पुण्यापाठोपाठ नालासोपाऱ्यातही भोंदूबाबाकडून महिलेचा विनयभंग, पोलिसांनी भोंदूबाबाच्या मुसक्या आवळल्या https://goo.gl/nG26dL
- गोव्यात म्हापश्यातील इंडियन ओव्हरसीज बँकेवर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न फसला, दोन दरोडेखोर अटकेत https://goo.gl/wLxNXd
- मुंबईतील गिरगाव चौपाटीवर सीप्लेनचं यशस्वी प्रात्यक्षिक, जमीन आणि पाण्यावर लँडिंग करू शकणार, स्पाईसजेटकडून 100 प्लेन विक्री करण्याची घोषणा http://abpmajha.abplive.in/
- भारताच्या पहिल्या महिला फोटो पत्रकाराला गुगलची आदरांजली, होमाई व्यारावाला यांना गुगलची डुडलमधून सलामी https://goo.gl/XYFdNs
- मध्य आफ्रिकेतील कांगोमध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांततादूतांवर हल्ला, 15 जणांचा मृत्यू तर 53 जखमी http://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement