एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 जानेवारी 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 जानेवारी 2020 | शुक्रवार
1. 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उस्मानाबादमध्ये उद्घाटन, ग्रंथदिंडीने शहरात उत्साह, संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या भाषणाची उत्सुकता https://bit.ly/37QCDjM
2. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर पोटनिवडणुकांमध्येही भाजपला धक्का, मुंबई, नाशिक महापालिकेत महाविकासआघाडीचा डंका, पनवेलमध्ये भाजपला यश https://bit.ly/35EoIvL
3. भुसावळमध्ये जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांच्यासमोर तुफान राडा https://bit.ly/39W4rFk
4. कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत वर्चस्वाची लढाई, महाविकासआघाडीतल्या अंतर्गत वादाचं नवं उदाहरण https://bit.ly/35GqcFM
5. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये भव्य नागरी सत्कार, शहरातून शोभायात्रा, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, तर परळीत धनंजय मुंडे यांचाही भव्य सत्कार https://bit.ly/36BZ7EZ
6. महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या दिल्ली भेटीनंतर विजय वडेट्टीवारांचा रुसवा दूर, मदत आणि पुनर्वसन खात्याची सुत्रे स्वीकारली https://bit.ly/2QJdZvX
7. काश्मिरातील इंटरनेट बंदीवरून केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी, प्रशासनानं सर्व आदेशांची समीक्षा करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश https://bit.ly/36IeVG7
8. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई, मुंबईतल्या घरासह 78 कोटींच्या संपत्तीवर टाच https://bit.ly/36G8CmJ
9. मुंबईत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मॉडेल आणि अभिनेत्रींना अटक तर दोन तरुणींची सुटका https://bit.ly/2saEZe3
10. साताऱ्यातील मांढरदेवी गडावर काळुबाईची यात्रा, महाराष्ट्रासह कर्नाटकातून भाविकांची गर्दी https://bit.ly/2FEmqSB
Tanhaji Movie Review | पुरेपूर लिबर्टी घेऊन केलेली शौर्यगाथा : https://bit.ly/36JgS5s
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*हॅलो अॅप* - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement