एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 01/06/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
![एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 01/06/2018 ABP Majha Whatsapp Bulletin 01/06/2018 एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 01/06/2018](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/07184240/whatsapp.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 01/06/2018*
- मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाण्यात काही ठिकाणी बत्ती गुल, महापारेषण'च्या कळवा सबस्टेशनमध्ये मोठा तांत्रिक बिघाड, दुरुस्तीला किमान आठवडा ते एक महिना लागण्याची शक्यता https://goo.gl/KE2J7f
- राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा दहा दिवसांच्या संपावर, खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ दूध रस्त्यावर ओतलं, शेतमाल पुणे-मुंबईला पाठवणं बंद, नासाडी न करण्याचं कृती समितीचं आवाहन https://goo.gl/wJqkYG
- एसबीआयच्या व्याजदरात 10 बीपीएसची वाढ; गृहकर्ज, पर्सनल लोन महागणार, आजपासून अंमलबजावणी http://abpmajha.abplive.in/
- एसटीच्या भाड्यात 30 टक्क्यांची प्रस्तावित वाढ, मुंबई-पुणे शिवनेरी प्रवास 134 रुपयांनी महागण्याची चिन्हं https://goo.gl/czbTDR
- कर्जफेडीसाठी कोल्हापुरात आरबीएल बँकेच्या महिला अधिकाऱ्याची मुजोरी, कर्जफेडीसाठी आई आणि बायकोला विकण्याचा सल्ला https://goo.gl/BkWTwP
- पालघर पोटनिवडणुकीचा वचपा काढण्यासाठी कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपच्या निरंजन डावखरेंविरोधात शिवसेनेची उडी https://goo.gl/bhRgeK
- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, निरोप देण्यासाठी बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांसह जनसागर लोटला http://abpmajha.abplive.in/
- आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेले नाशिक महापालिकेचे सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील पुण्यातून घरी परतले, कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण https://goo.gl/ukiy1G
- अहमदनगरमधल्या चौंडीतील अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात गोंधळाप्रकरणी 51 जणांना अटक तर दीडशे लोकांवर गुन्ह्यांची नोंद https://goo.gl/hsQW8J
- शेवगा तोडल्याचा जाब विचारल्यामुळे राग, औरंगाबादेत 81 वर्षीय डॉक्टरवर तलवारीने हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद, हल्लेखोर अटकेत https://goo.gl/m32mfN
- सीतेला रामाने पळवलं, गुजरात बोर्डाच्या बारावीच्या संस्कृत पुस्तकात मोठी चूक, तर ही भाषांतराची चूक असल्याचं बोर्डाचं स्पष्टीकरण https://goo.gl/cACSKo
- महिनाभरापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी भारताची वेटलिफ्टर संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी, चानूवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई https://goo.gl/KnnSvA
- गोविंदासारखा डान्स करणाऱ्या काकांचा भन्नाट व्हिडीओ, मध्य प्रदेशातील संजीव श्रीवास्तव सोशल मीडियावर तुफान हिट, दुसरा व्हिडीओही व्हायरल https://goo.gl/My7cRw
- प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल लग्नात मिळालेला 63 कोटींचा आहेर परत करणार, नियमांमुळे शाही जोडप्याचा निर्णय https://goo.gl/ejUjNt
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)