एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2020 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- भारतात फेसबुक आणि व्हाट्सअॅप वर भाजप-आरएसएसचं कंट्रोल; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा गंभीर आरोप तर संयुक्त संसदीय समितीकडून चौकशीची मागणी https://bit.ly/33ZZk6u
- कोकणातील गणेशोत्सवासाठीच्या स्पेशल ट्रेन्सला थंड प्रतिसाद, पहिल्या ट्रेनमध्ये फक्त 30 प्रवासी https://bit.ly/31Z6yoy
- पुणेकरांसाठी खूशखबर... पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बससेवा पुढील आठवड्यात सुरू होणार https://bit.ly/2FkTvWP
- बीडमधील आश्रमातून 12 अल्पवयीन मुलामुलींची सुटका, अंधश्रद्धेतून देवाला सोडले असल्याची शक्यता! https://bit.ly/2E0R0sm
- मुलगा झाल्याचं सांगितलं अन् हातात मुलगी दिली, पिंपरीतील डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयावर कुटुंबियांचे आरोप https://bit.ly/2PZDt6Z
- पार्थ पवारांची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबियांचे प्रयत्न, उपमुख्यमंत्री अजित पवार, काका श्रीनिवास पवार, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार यांची संयुक्तिक चर्चा https://bit.ly/2Y6pvo8
- कृष्णा, वारणा नदीकाठाला यंदाही पुराचा धोका https://bit.ly/2FubhXU तर वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात सोडणार; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची घोषणा https://bit.ly/2E0Rq1U
- गडचिरोली जिल्ह्यात पर्लकोटा नदीला पूर, भामरागडमध्ये पाणी शिरल्याने अनेक घरे पाण्याखाली गेल्याने मध्यरात्री नागरिकांची धावपळ https://bit.ly/2PZ8EPD
- निरोप देण्यासाठी महेंद्र सिंह धोनीसाठी अखेरचा सामना आयोजित करावा; झारखंडच्या मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची बीसीसीआयकडे मागणी https://bit.ly/34hHfRF
- टीव्हीवर असा थेट रक्तपात असावा का? नवीन मराठी मालिका 'देवमाणूस'च्या प्रोमोमुळे सोशल मीडियावर चर्चा https://bit.ly/3iYaahJ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement