एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2020 | शनिवार
- “ग्लॅमरस” शिवसेना, शिवसेनेत नाराजी! सेनेतले सैनिक गेले कुठे? https://bit.ly/35T79dh उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून अभिनेते शरद पोंक्षे यांचं नाव? https://bit.ly/2TCrvC9
- देशभरातल्या 31 सैनिकी शाळांमध्ये ओबीसीचं 27 टक्के आरक्षण लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, पुढील शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी https://bit.ly/34K4cwE
- अकरावी प्रवेशापूर्वीच अकरावीच्या ऑनलाईन वर्गाला सुरुवात, मराठा आरक्षण स्थगितीमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचा निर्णय https://bit.ly/2HS07gX
- केंद्रीय निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा असल्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप, बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटणार नसल्याचाही दावा https://bit.ly/31W5hiL
- शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचं राज्यभर सत्याग्रह आंदोलन, वर्ध्याच्या सेवाग्रामपासून सुरुवात तर नांदेडमध्ये किसान अधिकार दिन https://bit.ly/2GeBIBw
- 'पुलवामा हल्ल्यावेळी काहींनी स्वार्थाचं राजकारण केलं', नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल गांधीवर टीका, गुजरातमध्ये सीप्लेन सेवेचंही उद्घाटन https://bit.ly/37VWEbR
- आईने काय शिकवण दिली माहिती नाही, पण बाप म्हणून माफी मागतो, बिग बॉसमध्ये जानकडून झालेल्या मराठी भाषेच्या अवमानासाठी कुमार सानूंचा माफीनामा https://bit.ly/3jDUlMY
- तुर्की, ग्रीसमध्ये कालच्या भूकंपाने हाहाकार; 27 ठार तर 800 हून अधिक जखमी, 7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्के; अनेक इमारती जमीनदोस्त https://bit.ly/37YEMgs
- बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराजांचं मुंबईत निधन, मुख्यमंत्र्यांसह अनेकांची श्रद्धांजली, सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://bit.ly/3mEmWU7
- IPL 2020, RCB VS SRH : रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर आणि सनरायजर्स हैदराबादसाठी 'करो या मरो'ची स्थिती https://bit.ly/2HGVmqL तर मुंबईची प्लेऑफमध्ये धडक, दिल्लीला प्लेऑफ गाठण्यासाठी आजचा सामना जिंकणं गरजेचं https://bit.ly/35RWRuc
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement