एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जून 2020 |सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जून 2020 | सोमवार
1. उद्यापासून शरद पवार दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर, खासदार सुनील तटकरेंकडून आज रायगडमध्ये पाहणी, तर सरकारच्या मदतीवरुन विरोधीपक्षाचं तोंडसुख
2. जीवनावश्यक वस्तू न मिळाल्याने कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची दगडफेक, पिंपरीच्या आनंदनगर झोपडपट्टी भागातील घटना
3. औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातील 2 कोरोना पॉझिटिव्ह कैदी फरार, कोविड सेंटरच्या खिडकीचे गज वाकवून पोबारा, बेगमपुरा पोलिसांकडून तपास सुरू
4. सांगली, कोल्हापुरातल्या पुराला अलमट्टी धरण जबाबदार नाही, वडनेरे समितीचा अहवाल, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांची माहिती
5. दहशत पसरवण्याच्या हेतूने पुण्यात टोळक्याचा राडा; पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड
6. पर्यटकांचा हिरमोड होणार, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून भुशी डॅमसह इतर पर्यटनस्थळांवर बंदी कायम
7. मिशन बिगीन अंतर्गत राज्यातीन जनजीवन काही प्रमाणात पूर्वपदावर, बेस्टची बससेवा सुरू, मोजक्या कर्मचाऱ्यांसह खाजगी कार्यालयंही सुरू
8. ओला-उबरच्या गाड्या अद्याप जागेवरच, चालकांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास कंपन्यांचा नकार, चालकांमध्ये नाराजी
9. अंबरनाथ, उल्हासनगरात कोरोना संशयितांचे हाल, अहवालाच्या प्रतीक्षेत असताना त्रास झाल्यास उपचार नाही
10. नियम आणि अटींसह तिरुपती बालाजी, सोमनाथ मंदिर 80 दिवसांनी खुलं; राज्यातली मंदिरे मात्र सरकारी आदेशाच्या प्रतिक्षेत
BLOG | 'कोरोना' के आगे जीत है!, माधवी देसाई यांचा ब्लॉग
BLOG | आता तरी 'बेड' मिळतील का?, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement