एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2020 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- 'नीट, जेईई परीक्षा वेळेतच होणार', परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली https://bit.ly/3h7IKp4
- शरद पवार याचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील बारा जण कोरोनाबाधित, पाच जण पवारांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक https://bit.ly/2CCItve तर शरद पवार यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचं राजेश टोपेंचं स्पष्टीकरण https://bit.ly/3iKEbkT
- महाराष्ट्रातले मॉल उघडू शकता, मग मंदिरं का नाही?; राज ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल, त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांनी भेट घेतल्यावर राज ठाकरे यांची सरकारला विचारणा https://bit.ly/2PZ1ACL
- 'मी WHO बद्दल बोललो, त्याचा आणि आपल्या डॉक्टरांचा काय संबंध?' माझा कट्ट्यावरील वक्तव्याचा निषेध करणाऱ्या डॉक्टरांना खासदार संजय राऊत यांचा सवाल https://bit.ly/3ayhUUE
- फेसबुक आणि भाजप यांच्यातल्या कथित संबंधाने राजकारण तापलं; भाजप फेसबुकच्या मदतीने द्वेष पसरवत असल्याच्या आरोपांना विधी आणि न्यायमंत्र्याचं उत्तर, फेसबुककडूनही निष्पक्ष असल्याची सारवासारव https://bit.ly/3kLFqlw
- मराठा आरक्षणाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी नाशिक, मुंबई, पिंपरीसह राज्यात ठिकठिकाणी मराठी क्रांती मोर्चाच्यावतीने जागरण आंदोलन https://bit.ly/311aPsu
- रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला; राजापूरच्या अर्जुना, कोदवली नदीला पूर https://bit.ly/2PWINYP तर पुणे, साताऱ्यात रेड अलर्ट! हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा, कोयनेच्या सहा दरवाजांतून 56 हजार क्युसेकने विसर्ग https://bit.ly/2PYJlNL
- गडचिरोलीमध्ये पूरस्थिती आणि रस्ता नसल्याने घनदाट जंगलात झाडाखाली गरोदर महिलेची प्रसूती; आरोग्यसेविकेमुळे वाचले प्राण https://bit.ly/2E9UwAu
- मुंबईतील शाळेच्या आवाहनाला अमेरिकेतल्या माजी विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद; लोकसहभागातून विद्यार्थ्यांसाठी मिळाले 40 स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप! https://bit.ly/3aygppl
- दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 50 व्या वर्षी हैदराबादमधल्या रुग्णालयात अखेरचा श्वास, बॉलिवूडमधला मराठमोळा दिग्दर्शक हरपला https://bit.ly/3gb2Sp2
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement